शिव स्फुर्ती

कोणतेही संकट आले कि डोळे बंद करायचे आणि स्वतःला एकच प्रश्न विचारायचा - हे संकट काय महाराजांवर चाल करून आलेल्या अफझल खाना पेक्षा मोठं आहे? उत्तर नक्कीच "नाही" असे मिळेल. त्यातूनही यदा कदाचित स्फुरण चढले नाही तर आग्र्या हुन सुटका आठवायची - महाराजांना कपटाने आग्र्याला कैद केले. चारहि बाजूला दुश्मन, परका मुलुख आणि सख्त पहारा. कुठल्याही क्षणी पुढच्या क्षणाचा भरवसा नाही. त्याही परिस्थितीत महाराज सुखरूप वाचलेच ना. नुसते वाचले नाही तर आपल्या सहकाऱ्यांना आणि शंभू राजांना सुद्धा सुखरूप सोडवून आणले. क्षणार्धात समोरचं संकट खुजं झालेच म्हणून समजा !! समर्थ सांगूनच गेलेत - शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी !! छत्रपती श्री शिवाजी महाराज की ... जय !!! - विशाल प्रफुल्ल कर्णिक