मधुबन खुशबू देता है !!

मी सहसा रात्री ९:०० नंतरच ऑफिस मधून निघतो. त्या सुमारास काही रेडिओ स्टेशन्स वर मस्त रेट्रो गाणी चालू असतात. दिवस भराचा क्षीण घालवायला अजून काय हव ? तर, त्या दिवशी (खरं तर रात्री), दिवस भराची ऑफिस-गिरी संपवून घरी निघालो. "आज कुणाच्या शिव्या पडल्या नाहीत, म्हणजे दिवस चांगला गेला” असं स्वतःचं कौतुक करून दिवसाची सांगता केली. कार मध्ये गाणी ऐकत-गुणगुणत निघालो. येसूदास च्या मधाळ आवाजात "मधुबन खुशबू देता है...." चालू होतं. वाटेत एका सिग्नलला गाडी कधी थांबवली माझं मलाच कळलं नाही. मी एक प्रकारच्या तंद्रीत होतो. अचानक काहीतरी चमकल्या मुळे माझी तंद्री तुटली. समोरून एक साधारण १०-१२ वर्षाचा मुलगा कसला तरी चेंडू हवेत उडवत येत होता. तो चेंडू हवेत उडाला कि त्या मधून निळा-लाल लखलखाट व्हायचा. त्या "bright light" ने मला "disturb" केलं होतं. चीड-चीड झाली यार! बर, आता हा पोरगा आपल्या जवळ येऊन "सर, २० रुपीस" वगैरे बोलून सतावणार. या विचाराने अजूनच वैताग वाढला. जमेल तितक्या चपळाईने मी कार च्या काचा वर उचलल्या आणि "हुश्श्श, सुटलो एकदाचा!" असा सुस्कारा ...