Posts

Showing posts from June, 2020

Long drive

Image
आज घरी वातावरण तंगच होतं. विराज चा नववी चा निकाल लागला होता. म्हटलं तर "निकालच" लागला होता.  म्हणजे, नाडकर्ण्यांच्या घराण्यात एवढे कमी टक्के कधी कुणाला पडले नव्हते  "काय-काय म्हणून करत नाही या मुला साठी? याचं महत्वाचं वर्ष म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडली मी. शाळा इतकी चांगली आहे. शिकवणी ला भरमसाठ पैसा ओतलाय. पण हा मुलगा अजिबात लक्ष देऊन अभ्यास करत नाही." आई चा त्रागा सुरु होता.  "बाबा, सांग ना रे आईला. दहावी म्हणजे काय सगळं आहे का? दहावी ला जर चांगले गुण नाही पडले तर काय जग संपणार आहे का?" विराज ने आपली बाजू मांडली. बाबा मात्र या सगळ्या प्रकारात शांत होता. आई आणि मुलगा दोघेही आपल्या-आपल्या ठिकाणी बरोबर होते. पण, बाबा काही बोलला नाही.  उरलेला दिवस तणावतच गेला.आदळ-आपट करत का होईना आई ने आपली कर्तव्ये पार पाडली. रात्री चे जेवण झाले आणि बाबा विराज ला म्हणाला - "चल, मस्त long drive ला जाऊन येऊ."  रात्री जेवणा नंतर बरेचदा दोघे बाप लेक आपल्या SUV मधून long drive ला जायचे. हा एक प्रकारे दोघांचा  छंदच होता. रात्री च्या रिकाम्या रस्त्या वर सुसाट गाडी प...

इच्छापत्र

Image
वृद्धाश्रमात येऊन शकुंतला बाईंना साधारण चार वर्षे झाली असतील. सत्तर च्या आस-पास वय. पण सुखवस्तू घरातून आल्यामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. राहणीमान सुद्धा एकदम व्यवस्थित. पाच वर्षांपूर्वी दत्तोपंत - म्हणजे शकुंतला बाईंचे मालक - गेले आणि सहा महिन्याच्या आत बाईंची रवानगी वृद्धाश्रमात झाली. मोठ्या मुलाने तळ मजला आणि छोट्या ने पहिला मजला असं वाटून घेतलं. बाईंनी आणि पंतांनी पै-पै जोडून बांधलेल्या त्या दोन मजली "पंढरी" मध्ये आता बाईंच्या नावाची एक "वीट" सुद्धा उरली नव्हती. पंतांचा धाक गेला आणि मुला-सुनांनी रंग बदलला. बाईंनी कित्येकदा मुलांकडे विनवणी केली होती. "बाबांनो, एका कोपऱ्यात पडून राहीन. पण,उरले-सुरले दिवस 'पंढरीत' घालवू दे. मालकांची आठवण आहे त्यात" आणि दर वेळी मुलांनी खोटी आश्वासनं देऊन त्यांची बोळवण केली. अगदी बाईंना कॅन्सर झालाय हे कळल्यावर सुद्धा मुलांनी त्यांच्या कडे लक्ष दिले नव्हते. पण, आज बाईंनी अचानक आपल्या मुलांना सहकुटुंब बोलावून घेतले होते. आजच्या भेटीला वकील काकांना सुद्धा बोलावले होते. श्री. मोकाशी हे पंतांचे वकील मित्र, त्यां...

बहीण-भाऊ

अलक (अति लघु कथा) "दादा.. दे ना", "दे रे" असं ती सारखी त्याच्या मागे लागली होती. तिची कसली तरी महत्वाची वस्तू त्याच्या हाती लागली होती.. बहिणीची मागणी पूर्ण करणार नाही तो भाऊ कसला ? तिने मागण्या अगोदरच तो तिला भरपूर देत होता...... त्रास !! - विशाल प्रफुल्ल कर्णिक (17/Jun/2020)