शाळा

आज अचानक काम वाल्या मावशींचा फोन आला. कोरोना च्या संकटात इतर असंख्य लोकांसारखं त्यांनी सुद्धा आपल्या गावी जाणं पसंत केलं. जवळपास 3 महिन्यांनी त्यांच्याशी बोलत होतो. इकडची-तिकडची ख्याली खुशाली विचारून झाल्यावर त्यांनी विचारलं - "छोटू काय म्हणतुया? त्यो बी लई कंटाळला असल ना? शाळा बी बंद हाय लै दिवस." "अगदी तसं काही नाही. आता त्याची ऑनलाइन शाळा सुरू झालीये. ऑनलाइन म्हणजे कॉम्प्युटर वर. त्याच्या साठी नवीन कॉम्प्युटर घेतला बघा! सकाळचा वेळ शाळा, मग दुपारी क्लास, कधी चित्रकला, तर कधी अजून काहीतरी चालू आहे! काय आहे, शाळेत जरी जाणं होत नसलं तरी आता असच काहीतरी करून शिक्षण सुरु ठेवावं लागणार मुलांचं" - मी उत्साहात सांगत होतो!! "बर, तुमच्या मुलीचं कसं सुरू आहे? तिची सुद्धा ऑनलाईन शाळा सुरु असेल ना ?" मी त्यांना विचारलं "न्हाई वो दादा, तिला काढून टाकलं शाळेतून" - त्यांनी अगदी सहजपणे सांगून टाकलं "अहो मावशी असं काय करता? हे बघा, सध्या सगळ्या शाळा ऑनलाइन आहेत. अगदी मोबाईल वर पण चालू आहेत. तुम्हाला मोबाईल ची काही अडचण आहे का? मी लगेच चांगला मोबाईल घेता येई...