Posts

Showing posts from December, 2021

एकमत

Image
  एकदा आमच्या चाळी मध्ये हस्ताक्षर स्पर्धा झाली. मी सुद्धा त्यात सहभागी झालो आणि हस्ताक्षर स्पर्धे साठी हसत अक्षरं लिहून दिली.  स्पर्धा फारच अटी-तटीची झाली. स्पर्धकांनी पेपरवर लिहून दिल्यावर खूप वेळ तीनही परीक्षकानीं खूप गंभीर चर्चा केली. चांगला पाऊण तास मंथंन झाल्यावर, त्या परीक्षकांपैकी सगळ्यात "सीनीयर" जोशी काका निकाल सांगायला उभे राहीले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. जोशी काका - "आज या स्पर्धेने खर्या अर्था ने परीक्षकांचीच परीक्षा पाहिली असे म्हणावे लागेल. एक से बढकर एक हस्ताक्षर. आम्ही स्वतंत्रपणे काढलेल्या क्रमवारी मध्ये प्रत्येक स्पर्धक वेगळ्या नंबर वर होता. म्हणजे तीन ही परीक्षकांचे कुठल्याच नावावर एकमत नव्हते."   ते पुढे बोलत राहिले - "हा... पण जसा प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा इथे सुद्धा एक अपवाद आहे. तो अपवाद म्हणजे विशाल !! त्याच्या क्रमवारी  साठी आमचं क्षणार्धात एकमत झाले. त्याच्या मुळे आमचा थोडा वेळ वाचला. तेवढ्या साठी विशाल ला खास धन्यवाद !!"  इथे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. एकदम सेलिब्रिटी असल्या सारखं वाटलं.  मनात म्हटलं - म...

Activa

Image
बँकेतून बाहेर पडत होतो. समोर पार्किंग मध्ये एक सुंदर तरुणी तिच्या काळ्या ऍक्टिवा चे हॅन्डल लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या जोडीला तिथलाच सेक्युरिटी वाला आणि काही उत्साही कार्यकर्ते सुद्धा प्रयत्न करत होते. कधी ते जोरात हॅन्डल ला झटका देत होते, कधी चावी काढून पुन्हा लावत होते. कुणी "जवळच एक चावी वाला आहे त्याला बोलावू" असे सुचवत होते. एकूण काय? तर एक अबला संकटात आहे म्हटल्यावर बरेच उत्साही कार्यकर्ते धावून आले होते.    असो, मी माझ्या गाडी पर्यंत पोहचेस्तोवर त्यांचे निरीक्षण करत होतो. त्यांचा आतापिटा पाहताना माझ्या असे लक्षात आले की वाहनांच्या त्याच रांगेत अजून एक काळी ऍक्टिवा उभी आहे. मनात म्हटलं - ही पोरगी नक्कीच चुकीची गाडी उघडण्याचा प्रयत्न करतेय. वेंधळी कुठली. नंबर चेक न करता बसली असेल दुसरी गाडी उघडत.  आता मुळातच मी "स्त्री दाक्षिण्य" असल्या मुळे, तिची ही गडबड लक्षात आल्यावर मी लगेचच तिच्या मदतीला पुढे सरसावलो.   :)    मी - "मॅडम, गाडी चा नंबर नीट पाहिलात का? मला वाटतंय तुमची गाडी तिथे आहे. सेम दिसणाऱ्या गाड्यांमुळे गडबड झाली असेल. ती सुद्धा काळी...

Choice

Image
  गिफ्ट शॉप मध्ये असताना विक्रम मला म्हणाला - "भावा... पुण्यात आल्या पासून तू माझी भारी बडदास्त ठेवलाईस !! एकदम भारी काळजी घेतलाईस. मला एक  गिफ्ट द्यायचय तुला. इथ जी पण वस्तू तुला आवडेल ती माझ्या कडून तुला भेट!!"  तसा विक्रम काही माझा खूप खास मित्र वगैरे नव्हता. कधीतरी US मध्ये असताना माझ्या एका मित्राच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती. एकदम फक्कड माणूस. US मध्ये सेटल झालेला अस्सल कोल्हापुरी. एकदा भेटला की समोरच्याला आपलेसे करणारा. कोल्हापुरी ठसका आणि US चा मस्का असे एक वेगळंच मिश्रण होता. मोठ्या कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर होता. पुण्यात त्याच्या ऑफिस च्या कामासाठी आला होता. पुण्यात येणार म्हटल्यावर त्याने मला फोन करून भेटायला बोलावून घेतले. मी सुद्धा, पुन्हा एकदा अमेरिकन-कोल्हापुरी भेटणार म्हणून आनंदाने त्याला भेटायला गेलो. दिवस भर पुणे दर्शन करून, संध्याकाळी त्याने त्याच्या परीवारासाठी काही भेटवस्तू घ्यायची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही पुण्यातल्या कॅम्प मध्ये आलो.  विक्रम च्या ह्या अचानक ऑफर ने मला बुचकळ्यात टाकलं. मी त्याला म्हणालो.  "अजिबात नाही!! तू पाहुणा ...