मी आणि गीता
%20(27).jpeg)
माझा आणि गीते चा पहिला संबंध हिंदी चित्रपटातल्या कोर्ट सीन मुळे आला. मला आठवते कि तेव्हा दूरदर्शन वर आठवड्यातून एकदा चित्रपट दाखवायचे. त्यात न्यायालयात एखादा गुन्हेगार काहीतरी बोलणार तितक्यात एक मक्ख व्यक्ती हातात एक जाड पुस्तक आणायची आणि म्हणायची - "गीता पर हात रख कर कसम खाओ…" वगैरे वगैरे.. पण, त्या वयात ती गीता म्हणजे नक्की काय? हे कळत नव्हते. त्यानंतर जर कुठली गीता लक्षात राहिली असेल तर ती "सीता और गीता" मधली हेमा मालीनी. बेधडक , बिनधास्त असणारी ही गीता सुद्दा आम्हाला दूरदर्शन नेच दाखवली होती. अर्था-अर्थी ह्या गीता चा आणि महाभारतातल्या गीता चा काही संबंध नसला तरी "गीता" हे नाव ह्या चित्रपटामुळे मनावर चांगलंच बिंबलं. नंतर मी जेव्हा आठ-नऊ वर्षांचा असेन, तेव्हा बी. आर. चोप्रा यांची महाभारत सिरीयल सुरु झाली. त्याच्या सुरुवातीला महेंद्र कपूर ह्यांच्या धीर गंभीर आवाजातला "यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिरभवती भारत... " असा श्लोक शीर्षक गीता मध्ये यायचा. तो, माझा गीतेच्या श्लोकाशी आलेला पहिला संबंध. पण तरी, त्या वेळी हा श्लोक गीतेतील आहे हे माहिती नव्ह...