Ambulance

काल एक घटना घडली. म्हटलं तर अगदीच क्षुल्लक पण का कोण जाणे मला खूप छान वाटले! स्थळ: गोळीबार मैदान चौक सिग्नल. वेळ: सकाळी १०:३०. मी रोज कोंढवा ते औंध वाया कॅम्प अशी तपश्चर्या करून ऑफिस गाठतो. कालसुद्धा मी तेच करीत होतो. तर झाला असं, कि मी नेहमी प्रमाणे कॅम्प च्या दिशेने प्रस्थान केले. सकाळी घाई ची वेळ. खोड काढल्या प्रमाणे नेमका गोळीबार मैदान चा सिग्नल लाल झाला. "ह्याला पण आत्ताच लाल करायची होती का?" असा विचार (नेहमी प्रमाणे) त्या सिग्नलला थोडक्यात अडकलेल्या प्रत्येकाच्या मनात नक्की आला असणार ! असो, सिग्नल कधी एकदा हिरवा होतो याची वाट पाहत निमूट पणे उभा राहिलो (संस्कार दुसरा काय ;)) साधारण एका मिनिटात इथला सिग्नल हिरवा होतो असा अनुभव. त्या सुमारास असंख्य गाड्यांचे हॉर्न्स आणि गाडी चालू झाल्याचे आवाज येऊ लागले. हा अनुभव सुद्धा नेहमीचाच असल्या मुळे मी माझ्या गाडी चा आवाज त्यात मिसळला (मिले सूर मेरा तुम्हारा) इथपर्यंत सर्व नेहमीचेच ! आता खरी गम्मत ... अवघे ७-८ सेकंद बाकी असताना, लांबून एक ambulance चा आवाज आला. तो आवाज हळू हळू मोठा होतोय अ...