Ambulance
काल एक घटना घडली. म्हटलं तर अगदीच क्षुल्लक पण का कोण जाणे मला खूप छान वाटले!
स्थळ: गोळीबार मैदान चौक सिग्नल. वेळ: सकाळी १०:३०.
मी रोज कोंढवा ते औंध वाया कॅम्प अशी तपश्चर्या करून ऑफिस गाठतो. कालसुद्धा मी तेच करीत होतो.
तर झाला असं, कि मी नेहमी प्रमाणे कॅम्प च्या दिशेने प्रस्थान केले. सकाळी घाई ची वेळ. खोड काढल्या प्रमाणे नेमका गोळीबार मैदान चा सिग्नल लाल झाला. "ह्याला पण आत्ताच लाल करायची होती का?" असा विचार (नेहमी प्रमाणे) त्या सिग्नलला थोडक्यात अडकलेल्या प्रत्येकाच्या मनात नक्की आला असणार !
असो, सिग्नल कधी एकदा हिरवा होतो याची वाट पाहत निमूट पणे उभा राहिलो (संस्कार दुसरा काय ;))
साधारण एका मिनिटात इथला सिग्नल हिरवा होतो असा अनुभव. त्या सुमारास असंख्य गाड्यांचे हॉर्न्स आणि गाडी चालू झाल्याचे आवाज येऊ लागले. हा अनुभव सुद्धा
नेहमीचाच असल्या मुळे मी माझ्या गाडी चा आवाज त्यात मिसळला (मिले सूर मेरा तुम्हारा)
इथपर्यंत सर्व नेहमीचेच ! आता खरी गम्मत ...
अवघे ७-८ सेकंद बाकी असताना, लांबून एक ambulance चा आवाज आला. तो आवाज हळू हळू मोठा होतोय असं लक्षात आलं. Ambulance दिसत नव्हती पण ती उजवी कडून येत असल्याचे जाणवले. अचानक माझ्या आजू- बाजू-मागचे-पुढचे सगळे आवाज शांत झाले. कोणी तरी statue केलय असे वाटले. आमचा सिग्नल ग्रीन झाला तरी एकही गाडी हलली नाही. त्याहुन मोठे आश्चर्य म्हणजे त्या काही सेकंदांमध्ये हॉर्न सुद्धा वाजले नाहीत. ती ambulance सर्र्र्र कन आमच्या समोरून गेली. कोणत्याच प्रकारचा प्राणी त्यांना आडवा गेला नाही! या सगळ्या मध्ये आमच्या सिग्नल चे चांगले ७-८ सेकंद निघून गेले हे विशेष. इतरवेळी "सिग्नल तोडणं हा आमचा जन्मसिद्ध" अधिकार आहे असं समजणाऱ्या आणि "हॉर्न हा वाजवण्या साठीच असतो" असं ठणकावून सांगणाऱ्या आमच्या पुण्यात हा एक चमत्कार होता. त्या सिग्नलला त्या वेळी एकही मामा (पोलीस) दिसत नव्हता! हे लक्षात आलं तेव्हा तर मी पडायचा बाकी राहिलो. जशी ती Ambulance पुढे गेली तसं Go म्हटल्या प्रमाणे सगळं पूर्व पदावर आलं (दिलाय हॉर्न तर वाजव कि मित्रा)!
Ambulance चा आवाज दूर दूर जात राहिला पण त्या १५ सेकंदांची शांतता मन प्रसन्न करून गेली…
Nice one brother
ReplyDelete