Promise !

"हॅलो! हा नंबर कुणाचा आहे ?" पलीकडून आलेल्या या प्रश्नाने मी थोडा गोंधळलोच. मला फोन करून असं विचारणारी व्यक्ति म्हणजे विश्वास चे बाबा होते. मी (पटकन स्वतःला सावरत उत्तर दिलं) - "काका मी विशाल बोलतोय. विश्वास चा मित्र" काका - "विशाल? कोण विशाल?" मी - "काका तुम्ही मला ओळखले नाहीत? मी विश्वास चा वर्गमित्र. लहान असताना बरेचदा आलोय तुमच्या कडे" आम्ही शाळेत असताना बरेचदा विश्वासच्या घरी जात असू. विश्वास चे मित्र आलेत म्हटल्यावर काका एकदम खुश !! कधी भेळ आणून दे तर कधी चॉकलेट. काकांचा स्वभाव एकदम खेळकर. आम्हा मुलांना बघून ते "हाफ चड्डी गॅंग" म्हणून चिडवायचे !!! काका - "अच्छा .. विशाल तू होय? कसा आहेस? अरे तुझ्या मोबाईल वरून इतक्यात ४-५ वेळा कॉल आलेत" विश्वास भारतात असताना कधीतरी मी त्याचा हा नंबर माझ्या कडे सेव्ह केला होता. आता त्याला सिंगापोर ला जाऊन सुद्धा ५-६ वर्ष झाली होती. त्याचा हा नंबर तसाच माझ्या कडे राहिला होता. पण मी त्यावर कधी कॉल केले? काका - "अरे बहुदा चुकून लागले असावेत. मी इथून बरेचदा हॅलो हॅलो म्हणालो पण तुझ्याकडू...