खरा कोच ..

MacD मध्ये पाऊल ठेवलं आणि नेहमी पेक्षा आज इथे जास्त गर्दी आहे हे लक्षात आलं. कुठल्या तरी क्लब ची 10-12 मुलं तिथे होती. साधारण पाचवी-सातवीतली ती मुलं असावीत आणि नुकतंच कुठलं तरी मैदान मारून आलेत असं त्यांचं सेलिब्रेशन सुरु होतं. त्यांचा तो ओसंडून वाहणारा उत्साह खरंच खूप भारी वाटत होता. त्यांच्यातल्या काही मुलांचे ऑर्डर देणे सुरु होते. त्यामुळे काउंटर ला गर्दी होती. माझ्या समोर त्यांच्यातलाच एक मुलगा आणि त्याच्या बरोबर बोलत उभा असलेला तरुण दिसला. तो तरुण त्यांचा कोच असावा. त्या दोघांमधलं संभाषण हे खूप हात वारे करत सुरु होत. थोडा वेळ नीट लक्ष दिल्यावर कळलं कि "तो" मुलगा मूक-बधिर आहे. पण बाकीची मुलं तर तशी नव्हती!! मला त्या तरुणाचं कौतुक वाटलं. त्याने खूप सफाईदार पणे "त्या" मुलाशी संभाषण सुरु ठेवलें होते. एक-एक करत मुलं ऑर्डर देऊन बाजूला सरकत होती आणि त्या दोघांचा नंबर आला. मला वाटलं कि दोघेही एकत्र पुढे जातील. पण तसं काही झालं नाही. दोघांचे बोलणे आणि हातवारे सुरूच होते. शेवटी तो तरुण किंचाळलाच "You have to go !" आणि त्या मुलाला पुढे ढकलून स्वतः दोन पावले म...