Posts

Showing posts from July, 2020

लहानपण देगा देवा...

Image
लहान मुलांबरोबर वेळ घालवणे हा सगळ्यात चांगला stress buster आहे असे म्हणतात. मला हा अनुभव बरेचदा आलाय. त्यातील काही प्रसंग इथे टिपण्याचा प्रयत्न !! (Childs play - part 1) मी एकदा माझ्या पुतणी बरोबर स्कूटर वरून चाललो होतो. ती साधारण 4 वर्षाची असेल तेव्हा. तिच्या वयाच्या मनाने ती बोलायला खूप हुशार होती. अगदी मोठ्या लोकांसारख्या गप्पा मारायची. आता स्कूटर वर समोर उभी म्हटल्यावर तिचे निरीक्षण आणि खूप साऱ्या गप्पा. प्रवास कसा मजेत सुरू होता ! त्यातच शेजारून एक ambulance आली. मी माझी गाडी बाजूला घेतली आणि माऊ ला विचारलं. "माऊ, तुला ambulance म्हणजे काय माहिती आहे का ग?" तिने एकदम आत्मविश्वासाने उत्तर दिले - "काका, ambulance मध्ये आजारी माणूस घेऊन जातात. आणि कोणी मेलं असलं तरी लोकं ambulance बोलावतात. आणि ambulance आली ना की आपण बाजूला व्हायचं. आणि तिला आधी जाऊ द्यायचं असत!" तिच्या ह्या असल्या आणि-बाणी च्या उत्तराने मी मनातल्या मनात एकदम खुश ! काय हुशार आहे पोरगी! माझा पुढचा प्रश्न .. "अगं, पण मग ambulance ला आपण पुढे का जाऊ द्यायचं?" कपाळावर हात ...

हिमालय

Image
मला बरेचदा असं वाटतं की आपण ज्याला महादेव किंवा शंकर भगवान म्हणतो तो इतर कोणी नसून हिमालयच आहे.  म्हणजे बघा ना.. महादेव जसा ध्यान लावून बसलेला असतो तसाच हिमालय सुद्धा भासतो. अडीग, अचल, शांत... एखाद्या ध्यानस्थ योग्या सारखा... आणि बर्फाने आच्छादित हिमालयाची पांढरी शिखरे तर जणू महादेवाने अंगभर भस्म लावले आहे ! महादेवाच्या डोक्यावर मस्त चंद्रकोर असते, अगदी तसाच चन्द्र हिमालयाच्या शिखरांमधून डोकावत असतो! पुराणात अशी कथा आहे की, भागीरथी च्या तपाने पृथ्वीवर गंगा अवतरली. पण, तिचा प्रवाह इतका प्रचंड होता की महादेवाला आधी तिला आपल्या जंटांमध्ये ग्रहण करावी लागली आणि मग तिला पुन्हा प्रवाहित केले. हिमालयाच्या कडे, कपारी आणि जंगल रुपी जटांमधून वाहणारी गंगा तशीच तर येते !! 'ओम' पर्वताच्या रूपाने हिमालय जणू स्वतः 'ॐ' कसा लिहायचा हे पण माणसाला शिकवतो!!   आणि सगळ्यात कहर म्हणजे महादेवाचे तांडव !!! शांत आहे तोवर शांत पण एकदा जर देवाने तांडव केले की प्रलयच!! हिमालयाच्या भूकंप किंवा पूराच्या बातम्या वाचल्या की महादेवाचे तांडवच चालले आहे असे वाटते! हरी ॐ!! - विशाल प्रफुल्ल...

विचार

Image
अलक (अति लघु कथा) मित्राच्या नॅनो मधून चाललो होतो. तो खूप सांभाळून गाडी चालवत होता. सगळे नियम पाळत होता. सिग्नल न तोडता, कुठेही हॉर्न नाही की लेन कटिंग नाही!!  त्याला थट्टे ने म्हणालो - "नॅनो चालवतोयस, घुसव बिनधास्त, एखाद दोनदा घासली तरी काही फरक पडणार नाही !!" मित्र म्हणाला - "तू मला नॅनो चालवताना बघतोयस, पण मी स्वतःला Mercedes चालवताना बघतोय. चुकीच्या सवयी नंतर सुधारण्या  पेक्षा त्या लावूनच घ्यायच्या नाहीत! काय?" इतर लोकं आपल्याला कसं बघतात या पेक्षा आपण स्वतःला कसे बघतो हे महत्वाचे !! आपल्या नकळत आपले विचारच आपल्याला घडवत असतात ... - विशाल प्रफुल्ल कर्णिक