हिमालय
मला बरेचदा असं वाटतं की आपण ज्याला महादेव किंवा शंकर भगवान म्हणतो तो इतर कोणी नसून हिमालयच आहे.
म्हणजे बघा ना.. महादेव जसा ध्यान लावून बसलेला असतो तसाच हिमालय सुद्धा भासतो. अडीग, अचल, शांत... एखाद्या ध्यानस्थ योग्या सारखा... आणि बर्फाने आच्छादित हिमालयाची पांढरी शिखरे तर जणू महादेवाने अंगभर भस्म लावले आहे !
महादेवाच्या डोक्यावर मस्त चंद्रकोर असते, अगदी तसाच चन्द्र हिमालयाच्या शिखरांमधून डोकावत असतो!
पुराणात अशी कथा आहे की, भागीरथी च्या तपाने पृथ्वीवर गंगा अवतरली. पण, तिचा प्रवाह इतका प्रचंड होता की महादेवाला आधी तिला आपल्या जंटांमध्ये ग्रहण करावी लागली आणि मग तिला पुन्हा प्रवाहित केले. हिमालयाच्या कडे, कपारी आणि जंगल रुपी जटांमधून वाहणारी गंगा तशीच तर येते !!
'ओम' पर्वताच्या रूपाने हिमालय जणू स्वतः 'ॐ' कसा लिहायचा हे पण माणसाला शिकवतो!!
आणि सगळ्यात कहर म्हणजे महादेवाचे तांडव !!! शांत आहे तोवर शांत पण एकदा जर देवाने तांडव केले की प्रलयच!! हिमालयाच्या भूकंप किंवा पूराच्या बातम्या वाचल्या की महादेवाचे तांडवच चालले आहे असे वाटते!
हरी ॐ!!
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
Jarasa hatke ani changla wichar Mandelas ya weli
ReplyDeleteThanks!! Aaplya Nainital trip pasunach manat hota ha vichar :)
DeleteNice. 🔱
ReplyDeleteखुप सुंदर... ओम नमो शिवाय
ReplyDeleteखूप छान लिहिलंय ... वेगवेगळे विषय खूप चांगले आणि मोजक्या शब्दात वर्णन करतायत...खूप आवडला हा विषय...!!!👌👌👍👍
ReplyDeleteThanks a lot Yogita !!
DeleteKharach..atta himalay drishtikon बदलला 👍
ReplyDelete