चक्रम व्यूह

( सध्या लहान वयातच मुलांना कोडिंग शिकवण्याचा जो ट्रेंड सुरु आहे त्यावर हा काल्पनिक फार्स!! हा एक फार्स असल्याने याला फारसं मनावर घेऊ नका ) ---- वर्ष २०३० च्या पुढे कधी तरी ---- बॉस : "अभ्या अरे ए अभ्या, आधी माझ्या समोर ये" अभ्या (त्याच्या खुर्ची वरूनच) : "काय झालंय? आग लागली का काय?" बॉस : "आगच लावलीस तू ! इकडे ये आधी" अभ्या (बॉस समोर येत) : "काय झालं?" बॉस : "गधड्या, तिकडे production वर सगळे tables डिलीट मारलेस. बोंबलली सगळी सिस्टिम आणि कस्टमर सुद्धा" अभ्या : "आई शॉट, गडबड झाली राव ! शिट यार मी असं कसं करू शकतो ?" बॉस : "पॅनिक होऊ नकोस. अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये. दीर्घ श्वास घे. मी पॅनिक झालोय तेवढं पुरेसं आहे!" बॉस (थोडा विचार करून) : " अरे बघत काय उभा आहेस ? आधी जा आणि पटकन रोल-बॅक कर, झालंच तर बॅक-उप रिस्टोर मार. पळ पटकन" (अभ्या काही जागचा हलत नाही) बॉस : "अरे माझं तोंड काय बघतोय? जा ना" अभ्या : "जाऊन काय करू?" बॉस (वैतागून) : "जा आणि रोल-बॅक कर, बॅक...