चक्रम व्यूह
( सध्या लहान वयातच मुलांना कोडिंग शिकवण्याचा जो ट्रेंड सुरु आहे त्यावर हा काल्पनिक फार्स!! हा एक फार्स असल्याने याला फारसं मनावर घेऊ नका )
---- वर्ष २०३० च्या पुढे कधी तरी ----
बॉस : "अभ्या अरे ए अभ्या, आधी माझ्या समोर ये"
अभ्या (त्याच्या खुर्ची वरूनच) : "काय झालंय? आग लागली का काय?"
बॉस : "आगच लावलीस तू ! इकडे ये आधी"
अभ्या (बॉस समोर येत) : "काय झालं?"
बॉस : "गधड्या, तिकडे production वर सगळे tables डिलीट मारलेस. बोंबलली सगळी सिस्टिम आणि कस्टमर सुद्धा"
अभ्या : "आई शॉट, गडबड झाली राव ! शिट यार मी असं कसं करू शकतो ?"
बॉस : "पॅनिक होऊ नकोस. अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये. दीर्घ श्वास घे. मी पॅनिक झालोय तेवढं पुरेसं आहे!"
बॉस (थोडा विचार करून) : " अरे बघत काय उभा आहेस ? आधी जा आणि पटकन रोल-बॅक कर, झालंच तर बॅक-उप रिस्टोर मार. पळ पटकन"
(अभ्या काही जागचा हलत नाही)
बॉस : "अरे माझं तोंड काय बघतोय? जा ना"
अभ्या : "जाऊन काय करू?"
बॉस (वैतागून) : "जा आणि रोल-बॅक कर, बॅक-उप रिस्टोर कर.. परत-परत तेच-तेच का सांगायला लावतोय?"
अभ्या : "ते काय असतं?"
बॉस : "What do you mean?"
अभ्या : "ते रिस्टोर वगैरे जे म्हणालात ते काय असत?"
बॉस : "अरे इथे तू database expert म्हणून नोकरी करतोस ना? मग हे तू मला काय विचारतोय?"
अभ्या (शांत पणे) : "त्याचं काय आहे, कि मी database expert by birth आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे ना? "
बॉस (थोडा चिडून) : "हो रे..ते बघूनच तर तुझं selection झालं इथे. पण त्याचं आता काय सांगतोय परत? "
अभ्या : "हा, तर माझ्या आईने मी पोटात असताना माझ्यावर गर्भ संस्कार केले. त्या गर्भ संस्कारात Database module घेतलं आणि मी तिच्या पोटातच database शिकलो"
बॉस (थोडं अजून चिडून) : "अरे हो रे माझ्या सोन्या. तुला आईच्या पोटातून काढताना डॉक्टर ने Database चे पाच प्रश्न विचारले आणि तू सगळे बरोबर उत्तर दिलेस हे सुद्धा तू मला सांगितले आहेस."
अभ्या : "हो ना. मी उत्तर बरोबर दिली म्हणून बरं, नाही तर एक महिना त्या व्हेंटिलेटर मध्ये ठेऊन पुन्हा revision करून घेणार होते. पण मी पहिल्या attempt मध्ये पास झालो आणि जन्मतः Database expert बनलो !!"
अभ्या (आपला हात पुढे करत) : "हे बघा हातावर जन्मखूण म्हणून Database च चित्र पण आहे. Certificate of excellence. मी तुम्हाला interview मध्ये सुद्धा दाखवलं होतं"
बॉस : "अरे वाह! ते बघूनच तर तुला घेतला आम्ही!! पण हे असे संस्कारित गर्भ खूप आहेत आपल्या कंपनीत. आता तो आपला विन्या बघ ना , त्याच्या आई ने python चे संस्कार करून घेतले!"
अभ्या : "तो विन्या होय? त्याचा 'पायथन' चं काम बघून तुम्हाला 'पायताण' हाणावीशी वाटते, तोच ना?"
बॉस : "गप रे, तो विषयच नाहीये आता.. तू रोल-बॅक करणार का नाही ते सांग?"
अभ्या : "तेच तर सांगत होतो ना. तर काय झालं कि त्या Database कोर्स मधला delete वगैरे चा धडा आईने व्यवस्थित ऐकला, पण नेमका रोल-बॅक च्या वेळेला तिचा डोळा लागला! म्हणून मग माझ्या बापाने लॅपटॉप बंद करून ठेवून दिला. ते रोल-बॅक आणि रिस्टोर परत ऐकलंच नाही हो आई ने. आणि मला ते कधी कळलंच नाही !!"
बॉस (कपाळावर हात मारत) : "तरीच तुझ्या बापाने तुझं नाव अभिमन्यू ठेवलं होय.. तुला घेताना माझ्या हे लक्षात यायला हवं होतं रे !!!"
कलियुगी अभिमन्यू मुळे बॉस चा वध व्हायची वेळ आली !!
ता. क. - महाभारतातल्या अभिमन्यू ची गोष्ट माहिती असेल तर ह्या फार्स ची जास्त मजा येईल. (Story of Abhimanyu)
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
-
That time may be boss will just download database module from cloud into neurolink based brain cheap. And abhya will get everything 🔥😊
ReplyDelete