Posts

Showing posts from September, 2021

जगणं

Image
 

चीकू !

Image
  या वर्षी गणपती मध्ये मित्रा बरोबर घडलेला किस्सा ...  दोन वर्षातून पहिल्यांदाच सोसाइटी च्या गणपती आरती ला खाली उतरलो. मागच्या वर्षी कोरोना मुळे अजिबातच काही जमले नव्हते. या वर्षी कमीत कमी एकदा आरतीत सहभागी व्हावे ह्या विचाराने खाली उतरलो.  मित्रांशी गप्पा मारत असताना अचानक एक उंचा पुरा पोरगा समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला- "काका, ओळखलत का मला?"  एक तर मी जवळपास 2 वर्षानी लोकांना भेटत होतो, त्यात हा पोरगा मास्क लवून समोर उभा राहिला...  मित्र : नाही रे.. कोण तू?  तो: काका .. मी चिकू!  मित्र  : चिकू? अरे चिकू कसला? तू आता फणस  झालास  रे.. ओळखूच नाही आला 🤣🤣  तो पोरगा आता माझ्या मित्राशी बोलतोय का नाही हे अजून मला कळलेल नाही... 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ -  विशाल प्रफुल्ल कर्णिक  #kahihi

मनावरचा ताबा

 "अरे वा विशाल.. चांगला बरीक दिसतोयस !!"  - खूप दिवसांनी  भेटलेल्या माझ्या मित्राने मला compliment दिली !!  "काही काय? असं मला तरी वाटत नाही! उलट वजन वाढलच आहे सद्ध्या" - मी माझी बाजू सांगून टाकली.  "अरे खरच. थट्टा नाही करत मी... काय करतोस? काही tips  असतील तर दे! मित्रांना पण फायदा होऊ दे जरा"- त्याने काही त्याचे मत सोडले नाही.  "अरे, एकदम सोप्प असत ते... गोड खायचं कमी केलय एवढंच"- आता माझ्यातला आहारतज्ञ जागृत झाला होता.  "म्हणजे?" - मित्राचा कुतुहल मिश्रित प्रश्न.  "म्हणजे बघ, दिवसातून फक्त एखाद दुसरा रवा लाडू, 3-4 कप चहा आणि सद्ध्या गणपती सुरु आहे म्हणून आरती नंतर पेढ्याचा प्रसाद आणि उकडीचा मोदक. बास !! खूप ताबा ठेवावा लगतो मनावर असे results मिळवायला!!"  माझा माझ्या मनावरचा ताबा बघुन तो महप्रचंड वेगाने निघुन गेला... #kahihi विशाल प्रफुल्ल कर्णिक  (18/Sep/2021)