मनावरचा ताबा
"अरे वा विशाल.. चांगला बरीक दिसतोयस !!" - खूप दिवसांनी भेटलेल्या माझ्या मित्राने मला compliment दिली !!
"काही काय? असं मला तरी वाटत नाही! उलट वजन वाढलच आहे सद्ध्या" - मी माझी बाजू सांगून टाकली.
"अरे खरच. थट्टा नाही करत मी... काय करतोस? काही tips असतील तर दे! मित्रांना पण फायदा होऊ दे जरा"- त्याने काही त्याचे मत सोडले नाही.
"अरे, एकदम सोप्प असत ते... गोड खायचं कमी केलय एवढंच"- आता माझ्यातला आहारतज्ञ जागृत झाला होता.
"म्हणजे?" - मित्राचा कुतुहल मिश्रित प्रश्न.
"म्हणजे बघ, दिवसातून फक्त एखाद दुसरा रवा लाडू, 3-4 कप चहा आणि सद्ध्या गणपती सुरु आहे म्हणून आरती नंतर पेढ्याचा प्रसाद आणि उकडीचा मोदक. बास !! खूप ताबा ठेवावा लगतो मनावर असे results मिळवायला!!"
माझा माझ्या मनावरचा ताबा बघुन तो महप्रचंड वेगाने निघुन गेला...
#kahihi
विशाल प्रफुल्ल कर्णिक
(18/Sep/2021)
Comments
Post a Comment