चीकू !
या वर्षी गणपती मध्ये मित्रा बरोबर घडलेला किस्सा ...
दोन वर्षातून पहिल्यांदाच सोसाइटी च्या गणपती आरती ला खाली उतरलो. मागच्या वर्षी कोरोना मुळे अजिबातच काही जमले नव्हते. या वर्षी कमीत कमी एकदा आरतीत सहभागी व्हावे ह्या विचाराने खाली उतरलो.
मित्रांशी गप्पा मारत असताना अचानक एक उंचा पुरा पोरगा समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला- "काका, ओळखलत का मला?"
एक तर मी जवळपास 2 वर्षानी लोकांना भेटत होतो, त्यात हा पोरगा मास्क लवून समोर उभा राहिला...
मित्र: नाही रे.. कोण तू?
तो: काका .. मी चिकू!
मित्र : चिकू? अरे चिकू कसला? तू आता फणस झालास रे.. ओळखूच नाही आला 🤣🤣
तो पोरगा आता माझ्या मित्राशी बोलतोय का नाही हे अजून मला कळलेल नाही... 🤦♂️🤦♂️🤦♂️
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
#kahihi
Comments
Post a Comment