Fair Chance !



"विशाल... जरा दोन मिनिटे बोलू का?"
कानावर हे शब्द पडले आणि मी दचकलोच! हे विचारणारा दुसरा-तिसरा कोणी नसून आमच्या ऑफिस मधला सगळ्यात Brilliant समजला जाणारा शिशिर होता. मी नोकरीला लागून २-३ महिने झाले असतील, पण तेवढ्या काळात शिशिर बद्दल खूप ऐकले होते. कंपनीत त्याचा एक वेगळाच रुबाब होता आणि आदर ही!
तर, अशा या वलयांकित माणसाने मला विचारलेल्या प्रश्नाने मी पुरता गोंधळून गेलो अन ताडकन उभा राहिलो.
"शिशिर, मला बोलवायचे, मीच आलो असतो. काही काम आहे का? , मी तयार आहे!" नुकताच कॉलेज पास करून पहिल्या नोकरीत असणारा उत्साह माझ्या चेहऱ्यावर होता.
"कामाचं असं काही नाही, पण मघाशी तुम्ही मुलं जिथं कॉफी प्यायला उभे होतात ना, त्याला लागूनच माझं केबिन आहे." - शिशिर सांगत होता.
“Ohh… I am so sorry, आम्ही जरा जास्तच मोठ्याने बोलत होतो" आपल्या मुळे आजू बाजू च्या लोकांना त्रास होत असेल हे कॉफी पिताना आमच्या लक्षात आलं नव्हतं.
शिशिर ने मला थांबवलं.
"मला त्याचा काहीही त्रास झाला नाही. सवय झालीये आता! पण त्या बोलण्याच्या ओघात तू ऑफिस बद्दल बऱ्याच तक्रारी करत होता"
माझ्या पाया खालची जमीन सरकतेय का काय असं वाटू लागलं. कपाळावर घामाने हजेरी लावली. मी मित्रांशी बोलताना "काय यार इथली कॉफी किती बेचव आहे! इथला A.C. सुद्धा नीट चालत नाही.” असे बरेच तारे तोडले होते. पण, आता मलाच दिवसा तारे दिसायला लागले 🙁
मी काही बोलणार, तितक्यात शिशिर ने बाउन्सर टाकला.
"तू हे सगळे problems ऑफिस च्या admin ला सांगितलेस का रे ?"
(अर्थातच मी असे काही केले नव्हते. मित्र मंडळीत बोलण्याच्या ओघात बोलून गेलो होतो.)
मी नकारार्थी मान हलवली.
या बाउन्सर पाठोपाठ शिशिर ने यॉर्कर टाकला - “बरं, तिथे उभ्या असलेल्या लोकांपैकी हे सगळे problems कोण सोडवेल असे तुला वाटते?"
काय बोलावे सुचत नव्हते. मी फक्त “sorry” चा जप करत होतो. माझी अशी भांबेरी उडालेली पाहून शिशिर ने मला बसायला सांगितले.
"अरे, एवढा घाबरू नकोस. मी काही तुझं रॅगिंग करायला आलो नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं कि आपल्याला जर काही त्रास होत असेल तर तो योग्य त्या लोकांपुढे मांडावा. म्हणजे बघ, तुम्हा नवीन मुलांना ही मशीन ची कॉफी आवडत नाही हे कदाचित admin मध्ये कुणाला माहितीही नसेल. आणि जर हे तुम्ही सांगितलंच नाही तर ते कळणार कसे? आणि कधी कळलंच नाही तर गोष्टी सुधरणार कशा?"
माझ्या कडे त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण तो जे काही सांगत होता त्यात खूप Logic आहे असं वाटत होतं.
"आणि दुसरं असं कि एखाद्या व्यक्तीला व्यवस्थित संधी न देता मागे असं काही बोलणं मला तरी योग्य वाटत नाही. तुम्ही तरुण मुलं येता तर खूप उत्साह आणि नवा दृष्टिकोन घेऊन येता, त्याचा जर नीट वापर झाला नाही तर नुकसान तुमचं आणि कंपनीचं - दोघांचं ही"
मी परत उभा राहिलो आणि शिशिर चा हात हातात घेतला. "पुन्हा अशी चूक करणार नाही" एवढंच त्याला बोललो.
त्या एका संभाषणाने माझे डोळे चांगलेच उघडले. पुढच्या मिनिटाला कॉफी मशीन बद्दल रीतसर तक्रार नोंदवली. काही दिवसात ती मशीन जाऊन नवीन मशीन आली सुद्धा !!
त्या दिवसा पासून एक नियम नेहमी पाळला, कधी ही, कसला ही त्रास झाला तर गॉसिप न करता योग्य त्या व्यक्तीशी बोलायचे. दर वेळी problem आपल्याला हवा तसा solve होईल असे नाही, पण समोरच्याला “fair chance” दिला याचे समाधान नक्की मिळते!

विशाल प्रफुल्ल कर्णिक

Comments

  1. Ekdam practical blog...best one...fakta officech Nahi tar saglikade acharnat ananyasarkha...masta

    ReplyDelete
  2. Excellent.....chhan.....mast....mala eka interview darmiaan achanak office Kama nimitt jave lagnar hote. Tase mi interview panel la sangitale pn tyanni mala fakt ardha taas dya ashi vinavani keli {vinavani ho vinavani....shock basala na. Pn kharr aahe. NCRA Org} aamhala fair judge karnyasathi kiman 30min dya. Tyamule mala fair and unfair judge ya baddal ajun aapulki nirman zali. [P.S-Tya interview madhe me select zalo]

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह