मधुबन खुशबू देता है !!



मी सहसा रात्री ९:०० नंतरच ऑफिस मधून निघतो. त्या सुमारास काही रेडिओ स्टेशन्स वर मस्त रेट्रो गाणी चालू असतात. दिवस भराचा क्षीण घालवायला अजून काय हव ?
तर, त्या दिवशी (खरं तर रात्री), दिवस भराची ऑफिस-गिरी संपवून घरी निघालो. "आज कुणाच्या शिव्या पडल्या नाहीत, म्हणजे दिवस चांगला गेला” असं स्वतःचं कौतुक करून दिवसाची सांगता केली. कार मध्ये गाणी ऐकत-गुणगुणत निघालो. येसूदास च्या मधाळ आवाजात "मधुबन खुशबू देता है...." चालू होतं. वाटेत एका सिग्नलला गाडी कधी थांबवली माझं मलाच कळलं नाही. मी एक प्रकारच्या तंद्रीत होतो.
अचानक काहीतरी चमकल्या मुळे माझी तंद्री तुटली. समोरून एक साधारण १०-१२ वर्षाचा मुलगा कसला तरी चेंडू हवेत उडवत येत होता. तो चेंडू हवेत उडाला कि त्या मधून निळा-लाल लखलखाट व्हायचा. त्या "bright light" ने मला "disturb" केलं होतं. चीड-चीड झाली यार! बर, आता हा पोरगा आपल्या जवळ येऊन "सर, २० रुपीस" वगैरे बोलून सतावणार. या विचाराने अजूनच वैताग वाढला. जमेल तितक्या चपळाईने मी कार च्या काचा वर उचलल्या आणि "हुश्श्श, सुटलो एकदाचा!" असा सुस्कारा सोडला. मी ठरवलं होतं कि याने कितीही काच वाजवली तरी लक्ष द्यायचं नाही. वैतागून तो पुढे निघून जाईल. माझी strategy एकदम तयार होती.
तो पोरगा अजूनही माझ्या कार च्या दिशेने येत होता...
पण, माझ्या कडे येता-येता तो अचानक गाडी समोर थांबला आणि शेजारी उभ्या असलेल्या मोठ्या AC बस कडे बघू लागला. त्या बस कडे बघतच तो चेंडू जोरात वर उडवून मोठ्याने हसू लागला. मला क्षण भर कळले नाही कि नक्की काय चालू आहे ते. कुतूहल म्हणून मी थोडं डोकावून पाहिलं. त्या बस च्या बंद काचे मागून एक छोटंस मूल खूप खळखळून हसत होतं. चेंडू हवेत उडायचा, त्यातला light चमकायचा आणि दोघे हि हसायचे. हा खेळ माझ्या गाडी समोर साधारण अर्धा मिनिट चालू होता . माझी चीड-चीड गायब होऊन तिची जागा एका वेगळ्याच आनंदाने घेतली होती. चेहऱ्यावर आपसूकच एक मस्त "smile" आली आणि मी सुद्धा त्यांचा खेळ बघण्यात दंग झालो. त्या चेंडूंतला "bright light " आता अजिबात खुपत नव्हता!!
मी २० रुपये वाचवण्या साठी काचा बंद केल्या होत्या आणि हा पोरगा लाख मोलाचा खजिना भर रस्त्यात लुटत होता...
येसूदास च्या गाण्यातला "सुरज ना बन पाये तो, बनके दीपक जलता चल" या ओळींचा खरा अर्थ आज मला कळला होता !!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह