Nostalgia
एक दिवस अचानक whatsapp वर बातमी आली - दूरदर्शन वर रामानंद सागर यांचं रामायण सुरू होणार !! ( पाठोपाठ सतर्क
netizens चे "आता सरकार ने आपल्याला राम भरोसे सोडलंय" वगैरे जोक्स पण आले.)
खरं सांगायचं तर सुरुवातीला त्या बातमीचे मला काहीच वाटले नाही!! "हा.. ठीक आहे ना! दूरदर्शनच शेवटी ते.. तसही कोण
बघतो त्याला... आणि रामायण तर किती जुनी मालिका? जाऊदे, आपण भले आणि आपले काम भले" असा विचार करून
रामायणाचा विचार मी सोडून दिला.
पण, मग दोन दिवसानी पुन्हा एकदा रामायण मालिकेचे वेळापत्रक आले. बायको ने तर वट हुकूमच सोडला - "आजपासून
आपण सुद्धा रामायण बघू". मग काय? बायकोचा एवढा "वट" असताना "आराम" थोडेच करून चालणार? दूरदर्शनचं दर्शन घेऊन
कित्येक वर्षे लोटली होती. ढीगभर चॅनेल्सच्या पसाऱ्यातून सगळ्यात आधी दूरदर्शन चा नॅशनल चॅनेल शोधून काढला. मग
रामायणाच्या वेळा पाहून reminders लावून ठेवले आणि संधकाळच्या "राम भेटीची" वाट पाहू लागलो.
रात्री ९ च्या ठोक्याला "टिंग टिंग ट्रिंग ... " अशी रामायणाची सुरुवात झाली आणि बस.. मी आपसूकच मुलाला सांगू लागलो ....
"तुला सांगतो, हे music कानावर पडलं कि बास.. त्या काळात रस्त्यावर curfew लागायचा curfew!"
"पण असं काय होतं त्या मध्ये? curfew लागण्या सारखं" - मुलाला त्याच आश्चर्य लपवता आलं नाही
"बाळा, त्या काळात आजच्या सारखं २४ तास satellite TV नव्हते. जे काही असायचे ते हे दूरदर्शन वर. आठवड्यातून एकदा ..
म्हणजे फक्त रविवारी सकाळी अर्धा तास हे रामायण दाखवायचे. आमच्या चाळीत तर एकाच घरात TV होता. तो पण देशपांड्यांकडे.
ते रविवारी सगळ्यांना घरी येऊ द्यायचे. इतकी जत्रा व्हायची त्यांच्या घरात कि विचारता सोय नाही. अगदी व्हरांड्या पर्यंत गर्दी.
बरेचशे लोक तर फक्त रामायण ऐकून जायचे. रामायण सुरु झाल की TV ला हार घातलेले मी पाहिले आहेत!!"
पोराच्या चेहऱ्यावर, "पप्पा फुल्ल फ़ेकतायत" असे भाव होते :( पण, आजकालच्या इंटरनेट वाल्या स्मार्ट पिढीला, तो TV ला हार घालणारा भाबडेपणा खरा तरी कसा वाटणार? असो..
जसं-जसं एक-एक अध्याय दाखवत गेले - तस-तसा, आठवणींचा एक एक कप्पा उघडत गेला.
ती शबरीची बोरं, ती हनुमानाची एन्ट्री, बाली सुग्रीव युद्ध, मग लंकाधिपती रावण .. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युद्धात २
बाण सामोरा-समोर आले कि तो आवाज आणि "या वेळी कुणाचा बाण गायब होणार?" याची उत्कंठा :)
मी त्या वेळी हनुमानाचा कसा भक्त झालो आणि तोंड फुगवून कागदाची शेपटी लावून चाळभर कसा फिरायचो हे पण करून
दाखवलं !! कुरुक्षेत्रात अर्जुनाला कृष्णाच विश्वरूप दर्शन घडल्यावर जेवढं आश्चर्य झालं नसेल त्याहून जास्त अचंबा मुलाला
"हा नर , वानर" झाल्यावर झाला होता. ! गंमत म्हणजे या माझ्या किस्यांमध्ये मुलगा पण असा काही रमला की माझ्या मागे तोही
हनुमानाची सेना बनून फिरला :):)
रामायण कथे बरोबर माझ्या आठवणींचा एक side - track सतत सुरु होता. एखादं लहान मूल आपलं हरवलेलं खेळणं
सापडल्यावर जस खुश होईल, तशी माझी अवस्था झाली होती. काही दिवसांनी मुलाला सुद्धा रामायणाच्या कथे पेक्षा -
"पप्पा तुम्ही त्या वेळी काय करायचा" ह्यात जास्त interest येऊ लागला होता.
"अरे रावण मेला ना तेव्हा तर दिवाळी सारखा माहोल होता रे.. " त्या मालिकेतला एक एक क्षण लोकं जगत होते जणू!
"पण पप्पा, ह्यात हे सगळे कसले कॉमेडी वाटतात ! " इती चिरंजीव.
तेही खरच होत म्हणा… आजकालच्या VFX च्या जमान्यात, रामायणातील जटायू म्हणजे चौकातल्या गणपती मंडळाने केलेल्या
देखाव्यासारखा वाटत होता.
"ही मालिका बनवून 30 वर्ष झालीत. तेव्हा मी पण अगदी तिसरीत वगैरे असेन. हे सगळे
mythological इफेक्ट्स आणायला त्यांनी अशक्य कष्ट घेतले असणार…" माझ्या या सांगण्याचा काही परिणाम झाला असे
वाटले नाही.
खरं सांगायचं तर आता पाहताना त्या रामायणाची "production value" जरी कमी वाटत असली तरी "nostalgic value" ची मोजदाद कशी होणार ?
Lock down हे शरीराचं सुरू होत, पण मन तर बालपणात "राम-माण" झाले होते !!
जय श्री राम !
-विशाल प्रफुल्ल कर्णिक
खूप छान 👌👌
ReplyDeleteThanks Prasad !
Deleteक्या बात हे रामायण बघून मनातल्या भावना लेखणीतून प्रगट झाल्या
ReplyDeleteThanks Sameer!
ReplyDeleteEkdam nostalgic zale tuzya lekhamule
ReplyDeleteThanks ! 😊
DeleteKhup chaan, masta explain kela aahes sagla. Vipro che expression kay astil te pan lakshat aala..
ReplyDeleteThanks!!
Delete