पुरचुंडी
पुरचुंडी
हळू-हळू काठी टेकत-टेकत माई येत होत्या, त्यांचा लाडका श्री पहिल्यांदाच परदेशी चालला होता. म्हटलं, तर त्यांच काही नातं नव्हतं. पण गेली वीस वर्षं ते एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. श्री जेव्हा पाच-एक वर्षाचा होता, तेव्हा जोश्यांची पुण्यात बदली झाली. माई त्याच बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर राहत होत्या.
माईंचं सख्ख असं कुणीच नव्हतं. पण, श्री वर त्यांचा विशेष जीव होता. येता-जाता त्याला हाक मारून कधी शेंगा तर कधी लाडू असे 'खाऊ' त्या देत असत. बरेचदा श्री चा अभ्यास सुद्धा माईच घ्यायच्या. अजूनही श्री घरी येताना "माई आलोय गं " अशी हाक देऊनच पायरी चढायचा.
ऑफिस च्या कामा निमित्त श्री २-३ महिने विदेश वारीला जाणार म्हटल्यावर माईंचीच जास्त लगबग झाली. जमतील तसे त्यांनी त्याच्या आवडीचे लाडू बनवले आणि पुरचुंडी बांधून श्री ला द्यायला त्या आल्या.
इकडे श्री ची मात्र चांगलीच गडबड सुरु होती. परदेशी तर सोडाच, पण हा पुण्या बाहेरही कधी गेला नव्हता. पुन्हा-पुन्हा याद्या तपासून घेत होता. काही राहिलं तर नाही? चेक इन बॅग, हॅन्ड बॅग सगळं तपासून घेत होता. त्यातच त्याच्या उत्साही मित्रांची झुंबड. कुणी ऑफीस मधले, कुणी शाळेतले. सावळा गोंधळ सगळा!! एवढी जत्रा बघून माई थोड्या गोंधळल्याच. आणलेली पुरचुंडी त्यांनी पटकन पदरा खाली लपवली.
माईंना येताना बघून श्री खुश झाला. "अगं जाता जाता येणारच होतो मी तुझ्या कडे !" असं म्हणून पटकन पाया पडला. माईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. स्वतःला सावरत त्यांनी श्री ची फिरकी घेतली - "काय माहिती? तुझ्या या यंग मित्रांच्या गोंधळात विसरलास तर?" आणि एकच हशा पिकला.
तेवढ्यात , “गाडी आली” अशी बिल्डींग मधल्या मित्रांनी आरोळी दिली. सर्वांनी जणू श्री ची मिरवणूकच काढली. आई-बाबांचा तर सूचनांचा पाढा सुरु होता. सगळ्यांना "हो हो" म्हणत श्री बाहेर पडला आणि बघता बघता जीना उतरलाही.
पण जितका लगबगी ने खाली उतरला तितकाच पटकन वर आला. "काही राहिलं का?" मित्रांनी विचारलं. श्री फक्त "हो, आलो एक मिनिटात" म्हणाला. "एवढा मोठा झाला पण वेंधळाच, कसं होणार याच परदेशात?" इति बाबा.
वर येऊन बघतो तर माई एकट्याच खुर्चीत बसून डोळे टिपत होत्या.
त्यांचा हात हातात घेऊन श्री म्हणाला - "माई, माझ्या साठी लाडू आणलेस आणि दिलेच नाहीस होय?" असं बोलत पटकन माईंच्या हातातली पुरचुंडी त्याने ओढून घेतली. माईंना काय बोलावं सुचेना.
"तिकडून येताना मस्त स्कर्ट टॉप आणतो तुला, म्हणजे तू पण यंग होशील !! काय?" श्री चं बोलणं ऐकून माई खळखळुन हसल्या. त्याला घट्ट कवटाळून "खूप मोठा हो" असं काही तरी पुटपुटल्या ...
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
Wow...
ReplyDeleteThanks
DeleteVishal kharach ek no. Lihito tu... vachtana nakalat dolyat pani ale.
ReplyDeleteThanks so much !!
DeleteVishal khup chaan.. very emotional..
ReplyDeleteThank you !
Deleteहृदयाला भिडणारं लिहिलं आहेस मित्रा..
ReplyDeleteThanks Mitra !!
DeleteChan
ReplyDeleteThanks a lot!
DeleteSuperb sahich
ReplyDeleteविशाल भाऊ एक नंबर हा 👌
ReplyDeleteधन्यवाद समीर गुरुजी!
Deleteवाह! खरंच छान..👍🙂
ReplyDeleteMast..
ReplyDeleteEk number jiju 💯
ReplyDeleteThanks Tejas
DeleteVishalji..khup Chan lihtat aapan..👍👍
ReplyDeleteThanks Prashant sir
DeleteWah! Vachatana chitr dolyapudhe ubhe rahile... Sundar kathan kele aahes. Anni title bhannaat! पुरचुंडी
ReplyDeleteThanks!!
Deleteनेहमीसारखे हृदयस्पर्शी लेखन!!
ReplyDeleteWahh khup Sundar lihilay...
ReplyDeleteअप्रतिम...
Thanks a lot
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteछानच आहे लिखाण
ReplyDeleteअप्रतिम लिहिले विशाल.
ReplyDelete