Speaker Phone
कॉलेज च्या शेवटच्या वर्षात विनायकला एका चांगल्या IT कंपनी मध्ये नोकरी लागली. विनायक आपल्या आई-बाबा आणि आजी सोबत गणेश चाळीत राहत होता.
नवीन नोकरी सुरु होऊन जेम-तेम आठवडा झाला असेल तोच आजी आजारी पडली. सुसाट धावू पाहणाऱ्या आयुष्याच्या गाडीला जणू स्पीड-ब्रेकर आडवा आला.
इकडे ऑफिस मध्ये विनायक आता चांगला स्थिराऊ लागला. त्याच्या बरोबर आणखीन ९ जणांचं कंपनी तर्फे ट्रेनिंग सुरु झालं. आज त्यांना Conference call संदर्भात ट्रैनिंग देणार होते. या सगळ्या नवीन पोरांना मोठ्या मीटिंग रूम मध्ये बसवण्यात आले. टेबलावरती मधो -मध एक स्पीकर फोन ठेवला होता.
"आता, या स्पीकर फोन वर आपले एक सिनियर मॅनेजर फोन करतील. त्यांच्याशी आपण सगळे ‘ते आपले कस्टमर आहेत’ असं समजून बोलायचं. प्रत्येकाने मोठयाने बोलायचं. आधी wish करायचं, स्वतःचं नाव सांगायचं ...." असे बरेच नियम सांगण्यात आले.
ठरल्या प्रमाणे फोनची घंटी वाजली. ट्रेनर ने फोन उचलला - "Hello! good evening, Suresh here." - असं अदबीने wish केलं.
पण, पलीकडून सिनिअर मॅनेजर ऐवजी रिसेपशनिस्ट चा आवाज आला - "सुरेश सर, त्या नवीन मुलांमध्ये कोणी विनायक आहे का हो? त्याच्या साठी फोन आहे."
विनायक च्या काळजात एकदम धस्स झालं. आजीचं काही?... छे -छे... पण मग असं ऑफिस च्या नम्बर वर का कोण फोन करेल ? ... असे एक ना अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले.
"मी ... मी विनायक!" - विनायक ताड्कन उठत म्हणाला.
तिकडून रेसेपशनिस्ट म्हणाली - "एक मिनिट, तुझ्या कुठल्यातरी मित्राचा फोन आहे"
तेवढ्यात पलीकडून आवाज आला - "काय रे विन्या , मोबाइल बंद ठेवलास म्हणजे मित्रांना सापडणार नाहीस असं वाटलं का तुला? "
आवाज ओळखीचा होता पण विनायक इतका गोंधळून गेला होता कि त्याला काही समजेना. - "कोण? कोण बोलताय तुम्ही?"
पलीकडून यथेछ शिव्यांचा वर्षाव झाला. भ च्या बाराखडीतल्या सगळ्या शिव्या झाल्या नंतर मित्र म्हणाला - "अरे नोकरीला लागला तर मित्राचा आवाज विसरलास होय? फुकणीच्या मी चाळीतला पक्या बोलतोय "
इकडे विनायक ची लाजेने चाळण झाली. आख्या मीटिंग रूम मध्ये हशा पिकला होता.
"अरे पक्या ऐक ना.." विनायक ते फोन वरच वादळ थोपवण्याचा प्रयत्न करत होता.
पण पक्या काही ऐकेना - "ऐक वगैरे काही नाही. तुझ्या ऑफिस जवळच आलोय. खाली ये. मस्त पैकी मस्तानी खाऊ. साडे-पाच वाजले ना भाऊ. ऑफिसला 'टाटा' करायचा आणि लगेच खाली यायचं."
या असल्या अनपेक्षित हल्ल्याने विनायक पुरता कोलमडला. त्याची अशी अवस्था बघून ट्रेनर पुढे सरसावला.
"मिस्टर पक्या, विनायक तुमच्याशी स्पीकर फोन वर बोलतोय आणि आम्ही अकरा जण तुमचा प्रेमळ संवाद ऐकतोय ... "
हे ऐकताच पक्याची भांबेरी उडाली. फोन ठेवताना सुद्धा पक्या ने "आईची XXXX" अशी काहीतरी शिवी हासडलीच.
फोन संपला आणि ट्रेनर सर्व मलांकडे पाहून म्हणाला - "तर, स्पीकर फोन वर बोलताना सगळ्यात पहिला नियम असा कि, फोन उचलल्या उचलल्या सांगायाच कि तुम्ही स्पीकर फोन वर आहात. नाहीतर, तुमच्या मैत्रीची खोली आख्या ऑफिस ला कळते !!"
मीटिंग रूम हसण्याच्या आवाजाने दणाणून गेली !!
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
31/May/2020
😀😀 masta. Tya phone cha photo baghun Nalanda madhla speaker phone athavla
ReplyDeleteAbsolutely !!
Deleteभाऊ मस्त झालं लिखाण
ReplyDeleteमला पण जरा जपून कमेंट करावं लागलं नाही तर स्पीकर फोन सारख व्हायच
Hahaha... Thanks Sam
DeleteSir..very practical..it happened similar to me as well. तेव्वा पासुन कानला खडा .😀
ReplyDeleteआणी फ़ोन बघुन ऑफ़िस मिटिंग्स ची आठवन जालि..missing office atomsphere..
Yes sir..
DeleteMasta lihilay vishal jiju
ReplyDeleteThanks..
Delete