Long drive
आज घरी वातावरण तंगच होतं. विराज चा नववी चा निकाल लागला होता. म्हटलं तर "निकालच" लागला होता. म्हणजे, नाडकर्ण्यांच्या घराण्यात एवढे कमी टक्के कधी कुणाला पडले नव्हते
"काय-काय म्हणून करत नाही या मुला साठी? याचं महत्वाचं वर्ष म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडली मी. शाळा इतकी चांगली आहे. शिकवणी ला भरमसाठ पैसा ओतलाय. पण हा मुलगा अजिबात लक्ष देऊन अभ्यास करत नाही." आई चा त्रागा सुरु होता.
"बाबा, सांग ना रे आईला. दहावी म्हणजे काय सगळं आहे का? दहावी ला जर चांगले गुण नाही पडले तर काय जग संपणार आहे का?" विराज ने आपली बाजू मांडली.
बाबा मात्र या सगळ्या प्रकारात शांत होता. आई आणि मुलगा दोघेही आपल्या-आपल्या ठिकाणी बरोबर होते. पण, बाबा काही बोलला नाही.
उरलेला दिवस तणावतच गेला.आदळ-आपट करत का होईना आई ने आपली कर्तव्ये पार पाडली. रात्री चे जेवण झाले आणि बाबा विराज ला म्हणाला - "चल, मस्त long drive ला जाऊन येऊ."
रात्री जेवणा नंतर बरेचदा दोघे बाप लेक आपल्या SUV मधून long drive ला जायचे. हा एक प्रकारे दोघांचा छंदच होता. रात्री च्या रिकाम्या रस्त्या वर सुसाट गाडी पळवायची. जणू वाऱ्याशी स्पर्धाच. आज त्या long drive ची दोघांना ही गरज वाटत होती. विराज तर पटकन खाली उतरून गाडीत बसला सुद्धा.
बाबा बराच वेळ गाडी चालवत होता. पण आज ३०-४० च्या पुढे काही वेग जात नव्हता. शेवटी न राहवून विराज बोललाच. "बाबा, आज आपण नेहमी सारखं जाणार नाही का?" बाबा काहीच बोलला नाही.
अजून थोड्या वेळाने विराज पुन्हा म्हणाला - "अरे बाबा, कंटाळा येतोय. ह्या स्पीड लाच चालवणार आहेस का गाडी तू?"
या वेळी बाबा बोलला - "काय फरक पडतोय, गाडी तर चाललीये ना?"
आता मात्र विराज जाम वैतागला - "बाबा, ही SUV आहे. २५०० CC च इंजिन. त्यात असला रिकामा रस्ता. ३०-४० ची स्पीड म्हणजे अपमान आहे रे ह्या गाडी चा."
त्याच्या ह्या बोलण्यावर बाबा ने गाडी थांबवली.
"मित्रा, गाडी जर तिच्या क्षमतेला नाही चालवली तर तो तिचा अपमान आहे. पण मग तू तुझ्या क्षमतेनुसार जेव्हा अभ्यास करत नाहीस तेव्हा तो तुला तुझा अपमान नाही वाटत? मला मान्य आहे कि दहावी म्हणजे जगाचा अंत नाही. पण म्हणून मग ठरवून काहीच करायचे नाही? तुझ्यात क्षमता आहे हे सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न आहे तो प्रयत्नांचा. आता तूच सांग, कुणाचं कुठे चुकतंय ते? निकालाची चिंता नाही पण प्रयत्नच होत नाहीत याचं दुःख आहे रे. .. "
विराज ला काय समजायचे ते समजले होते. पुढचा बराच वेळ दोघे गाडीतच बसून होतें ....
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
ekach number !!
ReplyDeleteThanks!!
DeleteKhup chaan
ReplyDeleteThanks !😊
DeleteApratim...
ReplyDeleteThanks!
DeleteMasta! Asach lihat ja uttam jamtay! - Yashodhan
ReplyDeleteThanks!!
Deleteमित्रा कमी शब्दात खूप छान मेसेज दिला आहेस...
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteThanks!!
DeleteEasy councelling with nice way
ReplyDelete:) thanks !!
Deleteआधुनिक काळातील बोधकथा,
ReplyDeleteईसापनीती ची आठवण झाली, खूप छान
धन्यवाद गुरूजी !!
Deleteखूपच मस्त जमतंय 👌👌👍👍
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteSuperb as usual
ReplyDeleteNumber 1 form of explanation to kids in simple way 👍very nice
ReplyDeleteThanks!!
DeleteSuperb. .👍👍
ReplyDeleteThanks Snehal
DeleteExcellent !
DeleteChhaan message vishlya..
ReplyDeleteMastach 👌👍
ReplyDeleteThanks !!
DeleteKhupach mast...Perfect way to make childrens understand🙏
ReplyDeleteThanks so much !!
Deleteछान्!!
ReplyDeleteThanks
Deleteमस्तच
Deleteछान असाच लिहित जा खूप सुंदर.
ReplyDelete