लहानपण देगा देवा...






लहान मुलांबरोबर वेळ घालवणे हा सगळ्यात चांगला stress buster आहे असे म्हणतात. मला हा अनुभव बरेचदा आलाय. त्यातील काही प्रसंग इथे टिपण्याचा प्रयत्न !!

(Childs play - part 1)

मी एकदा माझ्या पुतणी बरोबर स्कूटर वरून चाललो होतो. ती साधारण 4 वर्षाची असेल तेव्हा. तिच्या वयाच्या मनाने ती बोलायला खूप हुशार होती. अगदी मोठ्या लोकांसारख्या गप्पा मारायची. आता स्कूटर वर समोर उभी म्हटल्यावर तिचे निरीक्षण आणि खूप साऱ्या गप्पा. प्रवास कसा मजेत सुरू होता !

त्यातच शेजारून एक ambulance आली. मी माझी गाडी बाजूला घेतली आणि माऊ ला विचारलं.

"माऊ, तुला ambulance म्हणजे काय माहिती आहे का ग?"

तिने एकदम आत्मविश्वासाने उत्तर दिले -
"काका, ambulance मध्ये आजारी माणूस घेऊन जातात. आणि कोणी मेलं असलं तरी लोकं ambulance बोलावतात. आणि ambulance आली ना की आपण बाजूला व्हायचं. आणि तिला आधी जाऊ द्यायचं असत!"

तिच्या ह्या असल्या आणि-बाणी च्या उत्तराने मी मनातल्या मनात एकदम खुश ! काय हुशार आहे पोरगी!

माझा पुढचा प्रश्न .. "अगं, पण मग ambulance ला आपण पुढे का जाऊ द्यायचं?"

कपाळावर हात मारत ती म्हणाली..."अरे काका, जर ambulance लवकर पोचली नाही तर तो मेलेला माणूस परत जिवंत नाही का होणार? तो उठायच्या आत ambulance पोचायला पाहिजे ना?"

तिच्या ह्या प्रश्नाचं माझ्या जवळ खळखळून हसण्याशिवाय उत्तर नव्हते :)

क्रमशः

विशाल प्रफुल्ल कर्णिक

Comments

  1. हि आर्या होती का ?

    ReplyDelete
  2. हि निरागसता मोठे पणीही जपता आली असती आपल्याला, तर किती छान झाले असते....

    ReplyDelete
    Replies
    1. Kharach :) ani ambulance la ushir houn melele loka jivant zale aste tar ? 🤣

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह