विघ्नहर्ता
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी नाना एकदम तयार बसले होते. धोतर, सदरा, पगडी आणि हातात काठी. वयाने सत्तरी ओलांडली तरी रुबाब आणि दरारा अजूनही शाबूत होता. सालाबाद प्रमाणे या वर्षीही घरची सगळी तरुण मंडळी आणि बच्चे कंपनी लाडक्या गणरायाला आणायला गेले होते. आठ-नऊ वर्षाचा चिंटू तर जणू काही आपल्या मित्राला आणायला गेला होता. काय तो उत्साह !!
आता कुठल्याही क्षणी बाप्पांचे आगमन होणार होते.
"सुनबाई... आपली मंडळी आली वाटतं. 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोशामध्ये ओळखीचे आवाज ऐकू येतायत... " नानांनी उठता-उठता आपल्या सुनेला - म्हणजे अलकाला आवाज दिला.
घरात स्त्रियांची एकच लगबग सुरु झाली. आरतीचं ताट, घंटी, फुलं, पाणी सगळं घेता घेता तारांबळ उडाली. अलकाने पटकन पुढे होऊन दार उघडले. नानांचा अंदाज अगदी बरोबर होता. आपल्या लाडक्या गणरायाला घेऊन मंडळी दारातच उभी होती.
तितक्यात कोणी तरी घोषणा दिली - "गणपती बाप्पा ..." आणि चिंटू हात उडवत "मोरया" म्हणाला. पण, चिंटूचा जोश इतका अफाट होता, कि त्याचा हात गणपतीच्या मूर्तीला लागला आणि मूर्तीचा हात खटकन निखळला !!! क्षणार्धात उत्साहाने भरलेलं वातावरण असं बदलल कि काही विचारू नका.
चिंटू च्या बाबांनी म्हणजे अनिल ने पटकन "अक्कल नाही का रे तुला" म्हणत चिंटूला मागे ढकललं.
अलका तर किंचाळलीच - "चिंटू, कितीदा सांगितले कि जरा आजू बाजूला बघत जा"
जयघोषाची जागा ओरडण्याने आणि मुसमुसण्याने घेतली. चिंटू एखाद्या अपराध्या सारखा कोपऱ्यात उभा राहिला.
तेवढ्यात नाना दारा पाशी आले. "अरे अचानक काय झाले? एवढी शांतता का झाली बाळांनो? गणरायाचा जयघोष अखंड चालू राहिला पाहिजे".
कोणी काहीच बोलेना. असा बाका प्रसंग पहिल्यांदाच सर्वां समोर आला होता. काय करावं? नानांना काय सांगावं? कुणाला काही सुचत नव्हतं.
समोरचं दृश्य पाहून ते सुद्धा स्तब्ध झाले. अलका रडत-रडत म्हणाली - "नाना, अपशकुन झाला हो. ह्या चिंटू च्या धांदरटपणा मुळे गणेशाची मूर्ती भंगली. आता घरावर काहीतरी मोठं संकट नक्की येणार!!!"
नानांना झाला प्रकार समजला. त्यांनी आवाज दिला - "चिंटू, कुठे आहेस तू? आधी माझ्या समोर ये."
चिंटू एवढा घाबरला होता कि त्याला नानांनी दिलेला आवाज सुद्धा ऐकू आला नसावा. तो येत नाही असं पाहून नानाच त्याच्या जवळ गेले. "चिंटू, गणपतीची किती नावे तुला ठाऊक आहेत रे?"
नानांच्या प्रश्नाने सगळेच गोंधळले. चिंटू मुसमुसत बोलला - "गणपती, गणेश, वक्रतुंड, विनायक, विघ्नहर्ता..."
त्याच बोलणं मध्येच तोडत नाना म्हणाले - "शाबास, विघ्नहर्ता!! ... आणि विघ्नहर्ता म्हणजे काय? हे तुला ठाऊक आहे का?"
चिंटू ने नकारार्थी मान हलवली.
नाना सांगू लागले -"अरे, विघ्नहर्ता म्हणजे जो भक्तांची विघ्ने पळवून लावतो. या गणेशाने सुद्धा आपलं कुठलं तरी येणारं विघ्न स्वतःच्या हाताने बाजूला केलंय. मी ह्याला अपशकुन बिलकुल मानत नाही !!" सगळे आश्चर्याने नानांकडे पाहत होते. नानांच्या ह्या दृष्टिकोनाने सगळ्यांच्या मनावरचा ताण नाहीसा झाला होता.
नानांनी आपल्या बटव्यातून काही पैसे काढले आणि अनिल च्या हातात ठेवले - "ही मूर्ती आता अशीच राहू दे, गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण विधिवत हिचे सुद्धा विसर्जन करू. आता तुम्ही सगळे जा आणि चिंटूला आवडेल तशी नवीन मूर्ती आणा. आणि हो , नवीन मूर्ती बरोबर social distancing पाळा म्हणजे झालं"
आयुष्यात येणाऱ्या negative गोष्टींना positive पद्धतीने मांडल कि आपणच आपले विघनहर्ते होतो असा संदेशच जणू नानांनी त्या दिवशी दिला !!!
खूप सुंदर विचार आहेत
ReplyDeleteप्रत्येकाने असा विचार केला पाहिजे
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteखूपच सकारात्मक..छान 👍
ReplyDeleteKhup chan..👌
ReplyDeleteGharat mothe sobt have mhantat te hyach sathi... positive thought 👍🏻
Very good thoughts 👌
ReplyDeleteVery nice as always your positive thoughts...
ReplyDeleteVery nice write up🌝
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteKhupach chan..
ReplyDeleteNananchya attitude la Hats Off🙏🙏
Nice approach!
ReplyDeleteUttam kathanak... alternate generationcha relation ani mahatwa chhanach chitarlay
ReplyDelete