ती कोण ?
"ही तुमच्या ग्रुप मध्ये कोण आली आहे नवीन?" बायकोचे व्हॅट्सप स्टेटस बघताना नवर्याने विचारले.
"कोणाबद्दल विचारताय?" किचनमधे पोळ्या लाटता लाटता बायकोचा प्रती प्रश्न.
"अगं... तीच ग, निळ्या ड्रेस मध्ये." नवर्याने भाबडे पणाने उत्तर दिले.
"अच्छा ती होय... " बायको ने एवढेच बोलून एक पाॅज़ घेतला..
(आता इथे एक ट्रॅप टाकलेला असतो. समजदार नवरे ह्या पाॅईंट ला गप्प बसतात किंवा विषय बदलतात... )
पण ..
"अगं... बोल ना.. कोण आहे ती? निळ्या वन पीस मध्ये" नवर्याचा सर्व संकेतांकडे दुर्लक्ष ...
"नाही माहीती !!" विषय बदलण्यासाठी बायको ने दिलेली ही शेवटची संधी...
"अरे.. तुमच्या ग्रुप फोटो मध्ये आहे.. आणि ऑनेस्टली तुम्हा सगळ्या पेक्षा छान दिसते ती. वेल मेंटेंड!!" नवर्याचा अती उत्साह...
(लग्नाला लक्ष वर्षे झाली तरी हे असलं धाडस करायचे नसते...)
किचन मधून गॅस बंद केल्याचा, लाईट बंद केल्याचा आवाज आला..
मग अचानक समोर आपल्या डॉक्टर मेव्हण्याला पाहून नवरा थोडा दचकलाच.. स्वतःला सावरत विचारले..."अरे, डॉक्टर.. तू कधी आलास? मला माहीतच नाही!! "
तो पुढे काही बोलणार इतक्यात मेव्हणा म्हणाला...
"भाऊजी.. जरा आराम करा.. तुमचं नशीब चांगलं म्हणून थोडक्यात वाचलात! लाटणं थोडं अजून जोरात बसलं असतं तर आज तुमच्या फोटो ला हार घालावा लागला असता..."
भाऊजीच्या हातात औषध आणि पाणी ठेवत मेव्हण्याने विचारले- "पण मला एक कळत नाही... तुम्ही ताईला नक्की काय विचारले?"
ह्या प्रश्नानंतर घरात स्मशान शांतता पसरली...
-विशाल प्रफुल्ल कर्णिक
Ha ha ha, bhari ... Punha ashi chuk karu naka ;p
ReplyDelete🤕😄 स्वानुभव ?😜
ReplyDeleteNice presentation of every situation.
काहीही 😀😜
ReplyDelete