Activa
बँकेतून बाहेर पडत होतो. समोर पार्किंग मध्ये एक सुंदर तरुणी तिच्या काळ्या ऍक्टिवा चे हॅन्डल लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या जोडीला तिथलाच सेक्युरिटी वाला आणि काही उत्साही कार्यकर्ते सुद्धा प्रयत्न करत होते. कधी ते जोरात हॅन्डल ला झटका देत होते, कधी चावी काढून पुन्हा लावत होते. कुणी "जवळच एक चावी वाला आहे त्याला बोलावू" असे सुचवत होते.
एकूण काय? तर एक अबला संकटात आहे म्हटल्यावर बरेच उत्साही कार्यकर्ते धावून आले होते.असो, मी माझ्या गाडी पर्यंत पोहचेस्तोवर त्यांचे निरीक्षण करत होतो. त्यांचा आतापिटा पाहताना माझ्या असे लक्षात आले की वाहनांच्या त्याच रांगेत अजून एक काळी ऍक्टिवा उभी आहे. मनात म्हटलं - ही पोरगी नक्कीच चुकीची गाडी उघडण्याचा प्रयत्न करतेय. वेंधळी कुठली. नंबर चेक न करता बसली असेल दुसरी गाडी उघडत.
आता मुळातच मी "स्त्री दाक्षिण्य" असल्या मुळे, तिची ही गडबड लक्षात आल्यावर मी लगेचच तिच्या मदतीला पुढे सरसावलो. :)
मी - "मॅडम, गाडी चा नंबर नीट पाहिलात का? मला वाटतंय तुमची गाडी तिथे आहे. सेम दिसणाऱ्या गाड्यांमुळे गडबड झाली असेल. ती सुद्धा काळी ऍक्टिवाच आहे. एकदा चेक करा."
माझ्या या वाक्यावर तिला एकदम काहीतरी साक्षात्कार झाला, ४४० वोल्ट चा झटका बसावा तशी ती किंचाळली - "आईया खरंच की... ही माझी गाडी नाहीचे !!" असं म्हणत-म्हणत तिने २-३ सेकंद इकडे तिकडे पाहिले, मग धावतच एका "लाल" ऍक्टिवा जवळ गेली आणि म्हणाली - "ही माझी गाडीये!"
मॅडम ने हातातली चावी गाडीला लावली, झटक्यात गाडी सुरु केली आणि ठसक्यात पोरगी बाहेर पडली!
उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे चेहरे रागाने तिच्या ऍक्टिवा सारखे झाले .... लाल !
हा हा हा एकच नंबर
ReplyDeleteThanks Sameer :)
Delete😆😆😆
ReplyDeleteWomen's are always excused
ReplyDeleteTrue 😀😀
Delete🤣🤣🤣
ReplyDeleteहोतं असं कधीकधी...:-)
ReplyDeleteमुलीही colour blind असू शकतात हा नवा शोध लागला!
😉😂
ReplyDeleteलेखाचे नाव ॲक्टिव-व्हा पाहिजे ☺️
ReplyDeleteमदतीसाठी कार्यकर्ते Active होतेच:)
Deleteहा हा हा......
ReplyDeleteI am sure she skipped the Red-Black trees chapter in Data Structures 😀
ReplyDeleteThat's right !! And drawing classes in nursery;)
Delete😁😁
ReplyDeleteThanks Vaibhav !!
Delete😄😄
Delete😄😄
ReplyDelete