Choice
गिफ्ट शॉप मध्ये असताना विक्रम मला म्हणाला - "भावा... पुण्यात आल्या पासून तू माझी भारी बडदास्त ठेवलाईस !! एकदम भारी काळजी घेतलाईस. मला एक
गिफ्ट द्यायचय तुला. इथ जी पण वस्तू तुला आवडेल ती माझ्या कडून तुला भेट!!"
तसा विक्रम काही माझा खूप खास मित्र वगैरे नव्हता. कधीतरी US मध्ये असताना माझ्या एका मित्राच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती. एकदम फक्कड माणूस. US मध्ये सेटल झालेला अस्सल कोल्हापुरी. एकदा भेटला की समोरच्याला आपलेसे करणारा. कोल्हापुरी ठसका आणि US चा मस्का असे एक वेगळंच मिश्रण होता. मोठ्या कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर होता. पुण्यात त्याच्या ऑफिस च्या कामासाठी आला होता. पुण्यात येणार म्हटल्यावर त्याने मला फोन करून भेटायला बोलावून घेतले. मी सुद्धा, पुन्हा एकदा अमेरिकन-कोल्हापुरी भेटणार म्हणून आनंदाने त्याला भेटायला गेलो. दिवस भर पुणे दर्शन करून, संध्याकाळी त्याने त्याच्या परीवारासाठी काही भेटवस्तू घ्यायची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही पुण्यातल्या कॅम्प मध्ये आलो.
विक्रम च्या ह्या अचानक ऑफर ने मला बुचकळ्यात टाकलं. मी त्याला म्हणालो.
"अजिबात नाही!! तू पाहुणा आहेस माझा आणि मी तुला भेटून किंवा पुणे दर्शन करवून काही मोठ्ठ काम केलं नाहीये. उलट तू आठवणीने मला भेटलास हेच खूप झालं. आमच्या भारतात अतिथी देवो भव: असे म्हणतात." मी त्यातल्या-त्यात त्याला "आमचा भारत" वगैरे म्हणून तो पुण्यात आला आहे ह्याची आठवण करून दिली :)
त्याने दोन-तीनदा मला - "लेका, घे की काहीतरी" असा दम
वजा आग्रह केला आणि मी सुद्धा तितक्याच शिताफीने तो परतवून लावला.
दिवस संपता-संपता त्याची निघण्याची वेळ झाली. आम्ही त्याच्या कॅब ची वाट पाहत उभे होतो. त्याची कॅब आली अन तो गाडीत बसणार तोच पटकन माझ्या कडे वळला आणि त्याच्या हातातील एक बॅग माझ्या हातात अडकवत म्हणाला - "Thanks for being fantastic host "
मी पुढे काही बोलणार तोच तो म्हणाला - "लेका, तुला चॉईस दिलेला तू घेतला नाही. तुला तुझ्या आवडीची वस्तू घेता आली नसती होय? पण आता तुला माझ्या आवडीची वस्तू घ्यावी लागतेय. Life मध्ये choice मिळाला की घेऊन टाकायचा, नाहीतर लोकं आपल्या साठी choose करतात…"
मला काही कळायच्या आत विक्रम गाडीत बसला आणि त्याची गाडी पुढे निघून गेली… गिफ्ट न स्वीकारण्याचा "choice" ही त्याने मला दिला नव्हता!!
विशाल प्रफुल्ल कर्णिक
छान 👌
ReplyDeleteChann
ReplyDeleteLai bhari...Shabda pan chaan use kele aahet..
ReplyDelete👌
ReplyDeleteखूप छान मेसेज!:-)
ReplyDeleteअप्रतिम लेख
ReplyDeleteखूप छान..👍
ReplyDeleteएकदम खर आहे. आपण आपल्या Choice ची संधी दुसऱ्यांना देतो. खर तर Choice ही नेहमी "संधीची" करायला हवी.
ReplyDeleteSir ji....you are great story teller..simply loved the thought that " Life मध्ये choice मिळाला की घेऊन टाकायचा, नाहीतर लोकं आपल्या साठी choose करतात…"
ReplyDelete