जांबुवंत

मला असं बरेचदा वाटतं की पालकांना मुलांसाठी जांबुवंत व्हावं लागतं. माझा तरी तसाच अनुभव आहे. रामायणात ज्याप्रमाणे मारुती रायाला त्याच्या सामर्थ्याची जांबुवंताने आठवण करून दिली, अगदी तसंच माझ्या मुलाला त्याच्या समर्थ्याची सतत आठवण करून द्यावी लागते... आमच्या घरी साधारण असा संवाद नित्यनेमाने होत असतो... मुलगा TV समोर सोफ्यावर ध्यानस्थ बसलेला आहे. त्याच्या हातात रिमोट नावाची माळ आहे जी तो हातात खेळवतो आहे. मी यादी, पिशवी आणि सायकल ची चावी समोर धरून त्याच्याशी बोलणं सुरु करतो... मी : बाळा जा रे जरा कोपऱ्यावरच्या दुकानातून हे समान घेऊन ये. मुलगा : सायकल वर जाऊ? मी : तुला जसं जायचे तसे जा. चालत गेलास तरी हरकत नाही. मुलगा : पण आत्ता तर अंधार पडलाय, मला अंधाराची भीती वाटते. मी : हो का? पण तुला आठवतंय का? मागच्या आठवड्यात आपण रात्री सिनेमा बघत होतो. तेव्हा तुला तहान लागली. तू किती पटकन उठून किचन मध्ये एकटा गेला होतास. किचन मध्ये केवढा अंधार होता तरी तू दिवे न लावताच जाऊन आलास. तेव्हा तर तू अजिबात घाबरला नव्हतास. तुला अंधाराची अजिबात भीती नाही... ( मुलाने अंधाराची कशी परवा केली नव्हती ह्...