आज घरी वातावरण तंगच होतं. विराज चा नववी चा निकाल लागला होता. म्हटलं तर "निकालच" लागला होता. म्हणजे, नाडकर्ण्यांच्या घराण्यात एवढे कमी टक्के कधी कुणाला पडले नव्हते "काय-काय म्हणून करत नाही या मुला साठी? याचं महत्वाचं वर्ष म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडली मी. शाळा इतकी चांगली आहे. शिकवणी ला भरमसाठ पैसा ओतलाय. पण हा मुलगा अजिबात लक्ष देऊन अभ्यास करत नाही." आई चा त्रागा सुरु होता. "बाबा, सांग ना रे आईला. दहावी म्हणजे काय सगळं आहे का? दहावी ला जर चांगले गुण नाही पडले तर काय जग संपणार आहे का?" विराज ने आपली बाजू मांडली. बाबा मात्र या सगळ्या प्रकारात शांत होता. आई आणि मुलगा दोघेही आपल्या-आपल्या ठिकाणी बरोबर होते. पण, बाबा काही बोलला नाही. उरलेला दिवस तणावतच गेला.आदळ-आपट करत का होईना आई ने आपली कर्तव्ये पार पाडली. रात्री चे जेवण झाले आणि बाबा विराज ला म्हणाला - "चल, मस्त long drive ला जाऊन येऊ." रात्री जेवणा नंतर बरेचदा दोघे बाप लेक आपल्या SUV मधून long drive ला जायचे. हा एक प्रकारे दोघांचा छंदच होता. रात्री च्या रिकाम्या रस्त्या वर सुसाट गाडी प...
वृद्धाश्रमात येऊन शकुंतला बाईंना साधारण चार वर्षे झाली असतील. सत्तर च्या आस-पास वय. पण सुखवस्तू घरातून आल्यामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. राहणीमान सुद्धा एकदम व्यवस्थित. पाच वर्षांपूर्वी दत्तोपंत - म्हणजे शकुंतला बाईंचे मालक - गेले आणि सहा महिन्याच्या आत बाईंची रवानगी वृद्धाश्रमात झाली. मोठ्या मुलाने तळ मजला आणि छोट्या ने पहिला मजला असं वाटून घेतलं. बाईंनी आणि पंतांनी पै-पै जोडून बांधलेल्या त्या दोन मजली "पंढरी" मध्ये आता बाईंच्या नावाची एक "वीट" सुद्धा उरली नव्हती. पंतांचा धाक गेला आणि मुला-सुनांनी रंग बदलला. बाईंनी कित्येकदा मुलांकडे विनवणी केली होती. "बाबांनो, एका कोपऱ्यात पडून राहीन. पण,उरले-सुरले दिवस 'पंढरीत' घालवू दे. मालकांची आठवण आहे त्यात" आणि दर वेळी मुलांनी खोटी आश्वासनं देऊन त्यांची बोळवण केली. अगदी बाईंना कॅन्सर झालाय हे कळल्यावर सुद्धा मुलांनी त्यांच्या कडे लक्ष दिले नव्हते. पण, आज बाईंनी अचानक आपल्या मुलांना सहकुटुंब बोलावून घेतले होते. आजच्या भेटीला वकील काकांना सुद्धा बोलावले होते. श्री. मोकाशी हे पंतांचे वकील मित्र, त्यां...
अलक (अति लघु कथा) मित्राच्या नॅनो मधून चाललो होतो. तो खूप सांभाळून गाडी चालवत होता. सगळे नियम पाळत होता. सिग्नल न तोडता, कुठेही हॉर्न नाही की लेन कटिंग नाही!! त्याला थट्टे ने म्हणालो - "नॅनो चालवतोयस, घुसव बिनधास्त, एखाद दोनदा घासली तरी काही फरक पडणार नाही !!" मित्र म्हणाला - "तू मला नॅनो चालवताना बघतोयस, पण मी स्वतःला Mercedes चालवताना बघतोय. चुकीच्या सवयी नंतर सुधारण्या पेक्षा त्या लावूनच घ्यायच्या नाहीत! काय?" इतर लोकं आपल्याला कसं बघतात या पेक्षा आपण स्वतःला कसे बघतो हे महत्वाचे !! आपल्या नकळत आपले विचारच आपल्याला घडवत असतात ... - विशाल प्रफुल्ल कर्णिक
पुरचुंडी हळू-हळू काठी टेकत-टेकत माई येत होत्या, त्यांचा लाडका श्री पहिल्यांदाच परदेशी चालला होता. म्हटलं, तर त्यांच काही नातं नव्हतं. पण गेली वीस वर्षं ते एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. श्री जेव्हा पाच-एक वर्षाचा होता, तेव्हा जोश्यांची पुण्यात बदली झाली. माई त्याच बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर राहत होत्या. माईंचं सख्ख असं कुणीच नव्हतं. पण, श्री वर त्यांचा विशेष जीव होता. येता-जाता त्याला हाक मारून कधी शेंगा तर कधी लाडू असे 'खाऊ' त्या देत असत. बरेचदा श्री चा अभ्यास सुद्धा माईच घ्यायच्या. अजूनही श्री घरी येताना "माई आलोय गं " अशी हाक देऊनच पायरी चढायचा. ऑफिस च्या कामा निमित्त श्री २-३ महिने विदेश वारीला जाणार म्हटल्यावर माईंचीच जास्त लगबग झाली. जमतील तसे त्यांनी त्याच्या आवडीचे लाडू बनवले आणि पुरचुंडी बांधून श्री ला द्यायला त्या आल्या. इकडे श्री ची मात्र चांगलीच गडबड सुरु होती. परदेशी तर सोडाच, पण हा पुण्या बाहेरही कधी गेला नव्हता. पुन्हा-पुन्हा याद्या तपासून घेत होता. काही राहिलं तर नाही? चेक इन बॅग, हॅन्ड बॅग सगळं तपासून घेत होता. त्यातच त्याच्या उत्साही मित्र...
सत्य घटनेवर आधारित.. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे, किराणा वगैरे आणायचा असल्यास सकाळी अकराच्या आत जाऊन आणावा लागतो. आमच्या घरात शेवटच्या क्षणी काम सांगण्याची पद्धत आहे, साधारण पावणे अकरा वाजता बायको ने हातात एक यादी ठेवली आणि आदेश दिला - "लवकर जा आणि हे सामान घेऊन ये. पावणे अकरा वाजलेत, आता दुकान बंद होईल पंधरा मिनिटात". मी पण एका गुणी नवऱ्या प्रमाणे ताबडतोब दुकान गाठले. अकरा वाजून गेले होते आणि दुकानदाराने शटर अर्ध बंद केलं होतं. आमची बरीच जुनी ओळख असल्या मुळे मी तसाच त्या अर्ध्या शटर खालून आत घुसलो. आतमध्ये फक्त दोन व्यक्ती होत्या...आणि आता तिसरा मी घुसलो होतो !! आमचा दुकानदार आणि एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली, तोंडावर व्यवस्थित मास्क, डोळ्यावर गॉगल आणि दोन वेण्या घातलेली एक आजी सदृश्य स्त्री बोलत उभे होते. मी धापा टाकत आत शिरलो होतो म्हणून चटकन लक्षात आले नाही. पण, थोड्या वेळात मला जाणवले की त्या बाईचा आवाज खूप ओळखीचा आहे. मी माझे काम विसरून त्यांचे बोलणे ऐकत होतो. त्या बाई इतक्या अदबीने आणि गोड आवाजात दुकानदाराची चौकशी करत होत्या की त्यांचं बोलणं ऐकत रहावस वाटलं. तेवढय...
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी नाना एकदम तयार बसले होते. धोतर, सदरा, पगडी आणि हातात काठी. वयाने सत्तरी ओलांडली तरी रुबाब आणि दरारा अजूनही शाबूत होता. सालाबाद प्रमाणे या वर्षीही घरची सगळी तरुण मंडळी आणि बच्चे कंपनी लाडक्या गणरायाला आणायला गेले होते. आठ-नऊ वर्षाचा चिंटू तर जणू काही आपल्या मित्राला आणायला गेला होता. काय तो उत्साह !! आता कुठल्याही क्षणी बाप्पांचे आगमन होणार होते. "सुनबाई... आपली मंडळी आली वाटतं. 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोशामध्ये ओळखीचे आवाज ऐकू येतायत... " नानांनी उठता-उठता आपल्या सुनेला - म्हणजे अलकाला आवाज दिला. घरात स्त्रियांची एकच लगबग सुरु झाली. आरतीचं ताट, घंटी, फुलं, पाणी सगळं घेता घेता तारांबळ उडाली. अलकाने पटकन पुढे होऊन दार उघडले. नानांचा अंदाज अगदी बरोबर होता. आपल्या लाडक्या गणरायाला घेऊन मंडळी दारातच उभी होती. तितक्यात कोणी तरी घोषणा दिली - "गणपती बाप्पा ..." आणि चिंटू हात उडवत "मोरया" म्हणाला. पण, चिंटूचा जोश इतका अफाट होता, कि त्याचा हात गणपतीच्या मूर्तीला लागला आणि मूर्तीचा हात खटकन निखळ...
गिफ्ट शॉप मध्ये असताना विक्रम मला म्हणाला - "भावा... पुण्यात आल्या पासून तू माझी भारी बडदास्त ठेवलाईस !! एकदम भारी काळजी घेतलाईस. मला एक गिफ्ट द्यायचय तुला. इथ जी पण वस्तू तुला आवडेल ती माझ्या कडून तुला भेट!!" तसा विक्रम काही माझा खूप खास मित्र वगैरे नव्हता. कधीतरी US मध्ये असताना माझ्या एका मित्राच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती. एकदम फक्कड माणूस. US मध्ये सेटल झालेला अस्सल कोल्हापुरी. एकदा भेटला की समोरच्याला आपलेसे करणारा. कोल्हापुरी ठसका आणि US चा मस्का असे एक वेगळंच मिश्रण होता. मोठ्या कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर होता. पुण्यात त्याच्या ऑफिस च्या कामासाठी आला होता. पुण्यात येणार म्हटल्यावर त्याने मला फोन करून भेटायला बोलावून घेतले. मी सुद्धा, पुन्हा एकदा अमेरिकन-कोल्हापुरी भेटणार म्हणून आनंदाने त्याला भेटायला गेलो. दिवस भर पुणे दर्शन करून, संध्याकाळी त्याने त्याच्या परीवारासाठी काही भेटवस्तू घ्यायची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही पुण्यातल्या कॅम्प मध्ये आलो. विक्रम च्या ह्या अचानक ऑफर ने मला बुचकळ्यात टाकलं. मी त्याला म्हणालो. "अजिबात नाही!! तू पाहुणा ...
एक दिवस अचानक whatsapp वर बातमी आली - दूरदर्शन वर रामानंद सागर यांचं रामायण सुरू होणार !! ( पाठोपाठ सतर्क netizens चे "आता सरकार ने आपल्याला राम भरोसे सोडलंय" वगैरे जोक्स पण आले.) खरं सांगायचं तर सुरुवातीला त्या बातमीचे मला काहीच वाटले नाही!! "हा.. ठीक आहे ना! दूरदर्शनच शेवटी ते.. तसही कोण बघतो त्याला... आणि रामायण तर किती जुनी मालिका? जाऊदे, आपण भले आणि आपले काम भले" असा विचार करून रामायणाचा विचार मी सोडून दिला. पण, मग दोन दिवसानी पुन्हा एकदा रामायण मालिकेचे वेळापत्रक आले. बायको ने तर वट हुकूमच सोडला - "आजपासून आपण सुद्धा रामायण बघू". मग काय? बायकोचा एवढा "वट" असताना "आराम" थोडेच करून चालणार? दूरदर्शनचं दर्शन घेऊन कित्येक वर्षे लोटली होती. ढीगभर चॅनेल्सच्या पसाऱ्यातून सगळ्यात आधी दूरदर्शन चा नॅशनल चॅनेल शोधून काढला. मग रामायणाच्या वेळा पाहून reminders लावून ठेवले आणि संधकाळच्या "राम भेटीची" वाट पाहू लागलो. रात्री ९ च्या ठोक्याला "टिंग टिंग ट्रिंग ... ...
बँकेतून बाहेर पडत होतो. समोर पार्किंग मध्ये एक सुंदर तरुणी तिच्या काळ्या ऍक्टिवा चे हॅन्डल लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या जोडीला तिथलाच सेक्युरिटी वाला आणि काही उत्साही कार्यकर्ते सुद्धा प्रयत्न करत होते. कधी ते जोरात हॅन्डल ला झटका देत होते, कधी चावी काढून पुन्हा लावत होते. कुणी "जवळच एक चावी वाला आहे त्याला बोलावू" असे सुचवत होते. एकूण काय? तर एक अबला संकटात आहे म्हटल्यावर बरेच उत्साही कार्यकर्ते धावून आले होते. असो, मी माझ्या गाडी पर्यंत पोहचेस्तोवर त्यांचे निरीक्षण करत होतो. त्यांचा आतापिटा पाहताना माझ्या असे लक्षात आले की वाहनांच्या त्याच रांगेत अजून एक काळी ऍक्टिवा उभी आहे. मनात म्हटलं - ही पोरगी नक्कीच चुकीची गाडी उघडण्याचा प्रयत्न करतेय. वेंधळी कुठली. नंबर चेक न करता बसली असेल दुसरी गाडी उघडत. आता मुळातच मी "स्त्री दाक्षिण्य" असल्या मुळे, तिची ही गडबड लक्षात आल्यावर मी लगेचच तिच्या मदतीला पुढे सरसावलो. :) मी - "मॅडम, गाडी चा नंबर नीट पाहिलात का? मला वाटतंय तुमची गाडी तिथे आहे. सेम दिसणाऱ्या गाड्यांमुळे गडबड झाली असेल. ती सुद्धा काळी...
( सध्या लहान वयातच मुलांना कोडिंग शिकवण्याचा जो ट्रेंड सुरु आहे त्यावर हा काल्पनिक फार्स!! हा एक फार्स असल्याने याला फारसं मनावर घेऊ नका ) ---- वर्ष २०३० च्या पुढे कधी तरी ---- बॉस : "अभ्या अरे ए अभ्या, आधी माझ्या समोर ये" अभ्या (त्याच्या खुर्ची वरूनच) : "काय झालंय? आग लागली का काय?" बॉस : "आगच लावलीस तू ! इकडे ये आधी" अभ्या (बॉस समोर येत) : "काय झालं?" बॉस : "गधड्या, तिकडे production वर सगळे tables डिलीट मारलेस. बोंबलली सगळी सिस्टिम आणि कस्टमर सुद्धा" अभ्या : "आई शॉट, गडबड झाली राव ! शिट यार मी असं कसं करू शकतो ?" बॉस : "पॅनिक होऊ नकोस. अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये. दीर्घ श्वास घे. मी पॅनिक झालोय तेवढं पुरेसं आहे!" बॉस (थोडा विचार करून) : " अरे बघत काय उभा आहेस ? आधी जा आणि पटकन रोल-बॅक कर, झालंच तर बॅक-उप रिस्टोर मार. पळ पटकन" (अभ्या काही जागचा हलत नाही) बॉस : "अरे माझं तोंड काय बघतोय? जा ना" अभ्या : "जाऊन काय करू?" बॉस (वैतागून) : "जा आणि रोल-बॅक कर, बॅक...
Comments
Post a Comment