Posts

Showing posts from 2020

चक्रम व्यूह

Image
   ( सध्या लहान वयातच मुलांना कोडिंग शिकवण्याचा जो ट्रेंड सुरु आहे त्यावर हा काल्पनिक फार्स!! हा एक फार्स  असल्याने याला फारसं मनावर घेऊ नका )   ---- वर्ष २०३० च्या पुढे कधी तरी ---- बॉस   : "अभ्या अरे ए अभ्या, आधी माझ्या समोर ये" अभ्या (त्याच्या खुर्ची वरूनच) : "काय झालंय? आग लागली का काय?" बॉस :  "आगच लावलीस तू ! इकडे ये आधी" अभ्या (बॉस समोर येत) : "काय झालं?"  बॉस :  "गधड्या, तिकडे production वर सगळे tables डिलीट मारलेस. बोंबलली सगळी सिस्टिम आणि कस्टमर सुद्धा"  अभ्या : "आई शॉट, गडबड झाली राव ! शिट यार मी असं कसं करू शकतो ?"  बॉस :  "पॅनिक होऊ नकोस. अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये. दीर्घ श्वास घे. मी पॅनिक झालोय तेवढं पुरेसं आहे!" बॉस (थोडा विचार करून) : " अरे बघत काय उभा आहेस ? आधी जा आणि पटकन रोल-बॅक कर, झालंच तर बॅक-उप रिस्टोर मार. पळ पटकन" (अभ्या काही जागचा हलत नाही)  बॉस :  "अरे माझं तोंड काय बघतोय? जा ना" अभ्या : "जाऊन काय करू?"  बॉस (वैतागून) : "जा आणि रोल-बॅक कर, बॅक...

शाळा

Image
आज अचानक काम वाल्या मावशींचा फोन आला. कोरोना च्या संकटात इतर असंख्य लोकांसारखं त्यांनी सुद्धा आपल्या गावी जाणं पसंत केलं. जवळपास 3 महिन्यांनी त्यांच्याशी बोलत होतो. इकडची-तिकडची ख्याली खुशाली विचारून झाल्यावर त्यांनी विचारलं - "छोटू काय म्हणतुया? त्यो बी लई कंटाळला असल ना? शाळा बी बंद हाय लै दिवस." "अगदी तसं काही नाही. आता त्याची ऑनलाइन शाळा सुरू झालीये. ऑनलाइन म्हणजे कॉम्प्युटर वर. त्याच्या साठी नवीन कॉम्प्युटर घेतला बघा! सकाळचा वेळ शाळा, मग दुपारी क्लास, कधी चित्रकला, तर कधी अजून काहीतरी चालू आहे! काय आहे, शाळेत जरी जाणं होत नसलं तरी आता असच काहीतरी करून शिक्षण सुरु ठेवावं लागणार मुलांचं" - मी उत्साहात सांगत होतो!! "बर, तुमच्या मुलीचं कसं सुरू आहे? तिची सुद्धा ऑनलाईन शाळा सुरु असेल ना ?" मी त्यांना विचारलं "न्हाई वो दादा, तिला काढून टाकलं शाळेतून" - त्यांनी अगदी सहजपणे सांगून टाकलं "अहो मावशी असं काय करता? हे बघा, सध्या सगळ्या शाळा ऑनलाइन आहेत. अगदी मोबाईल वर पण चालू आहेत. तुम्हाला मोबाईल ची काही अडचण आहे का? मी लगेच चांगला मोबाईल घेता येई...

विघ्नहर्ता

Image
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी नाना एकदम तयार बसले होते. धोतर, सदरा, पगडी आणि हातात काठी.  वयाने सत्तरी ओलांडली तरी रुबाब आणि दरारा अजूनही शाबूत होता.  सालाबाद प्रमाणे या वर्षीही घरची  सगळी  तरुण मंडळी आणि बच्चे कंपनी लाडक्या गणरायाला आणायला गेले होते. आठ-नऊ वर्षाचा चिंटू तर जणू काही आपल्या  मित्राला  आणायला गेला होता. काय तो उत्साह !! आता कुठल्याही क्षणी बाप्पांचे आगमन होणार होते.  "सुनबाई... आपली मंडळी आली वाटतं. 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोशामध्ये ओळखीचे आवाज ऐकू येतायत... " नानांनी उठता-उठता आपल्या सुनेला - म्हणजे अलकाला आवाज दिला.  घरात स्त्रियांची एकच लगबग सुरु झाली. आरतीचं ताट, घंटी, फुलं, पाणी सगळं घेता घेता तारांबळ उडाली. अलकाने पटकन पुढे होऊन दार उघडले. नानांचा अंदाज अगदी बरोबर होता. आपल्या लाडक्या गणरायाला घेऊन मंडळी दारातच उभी होती.  तितक्यात कोणी तरी घोषणा दिली - "गणपती बाप्पा ..." आणि चिंटू हात उडवत "मोरया" म्हणाला.  पण, चिंटूचा  जोश इतका अफाट होता, कि त्याचा हात गणपतीच्या मूर्तीला लागला आणि मूर्तीचा हात खटकन निखळ...

लहानपण देगा देवा...

Image
लहान मुलांबरोबर वेळ घालवणे हा सगळ्यात चांगला stress buster आहे असे म्हणतात. मला हा अनुभव बरेचदा आलाय. त्यातील काही प्रसंग इथे टिपण्याचा प्रयत्न !! (Childs play - part 1) मी एकदा माझ्या पुतणी बरोबर स्कूटर वरून चाललो होतो. ती साधारण 4 वर्षाची असेल तेव्हा. तिच्या वयाच्या मनाने ती बोलायला खूप हुशार होती. अगदी मोठ्या लोकांसारख्या गप्पा मारायची. आता स्कूटर वर समोर उभी म्हटल्यावर तिचे निरीक्षण आणि खूप साऱ्या गप्पा. प्रवास कसा मजेत सुरू होता ! त्यातच शेजारून एक ambulance आली. मी माझी गाडी बाजूला घेतली आणि माऊ ला विचारलं. "माऊ, तुला ambulance म्हणजे काय माहिती आहे का ग?" तिने एकदम आत्मविश्वासाने उत्तर दिले - "काका, ambulance मध्ये आजारी माणूस घेऊन जातात. आणि कोणी मेलं असलं तरी लोकं ambulance बोलावतात. आणि ambulance आली ना की आपण बाजूला व्हायचं. आणि तिला आधी जाऊ द्यायचं असत!" तिच्या ह्या असल्या आणि-बाणी च्या उत्तराने मी मनातल्या मनात एकदम खुश ! काय हुशार आहे पोरगी! माझा पुढचा प्रश्न .. "अगं, पण मग ambulance ला आपण पुढे का जाऊ द्यायचं?" कपाळावर हात ...

हिमालय

Image
मला बरेचदा असं वाटतं की आपण ज्याला महादेव किंवा शंकर भगवान म्हणतो तो इतर कोणी नसून हिमालयच आहे.  म्हणजे बघा ना.. महादेव जसा ध्यान लावून बसलेला असतो तसाच हिमालय सुद्धा भासतो. अडीग, अचल, शांत... एखाद्या ध्यानस्थ योग्या सारखा... आणि बर्फाने आच्छादित हिमालयाची पांढरी शिखरे तर जणू महादेवाने अंगभर भस्म लावले आहे ! महादेवाच्या डोक्यावर मस्त चंद्रकोर असते, अगदी तसाच चन्द्र हिमालयाच्या शिखरांमधून डोकावत असतो! पुराणात अशी कथा आहे की, भागीरथी च्या तपाने पृथ्वीवर गंगा अवतरली. पण, तिचा प्रवाह इतका प्रचंड होता की महादेवाला आधी तिला आपल्या जंटांमध्ये ग्रहण करावी लागली आणि मग तिला पुन्हा प्रवाहित केले. हिमालयाच्या कडे, कपारी आणि जंगल रुपी जटांमधून वाहणारी गंगा तशीच तर येते !! 'ओम' पर्वताच्या रूपाने हिमालय जणू स्वतः 'ॐ' कसा लिहायचा हे पण माणसाला शिकवतो!!   आणि सगळ्यात कहर म्हणजे महादेवाचे तांडव !!! शांत आहे तोवर शांत पण एकदा जर देवाने तांडव केले की प्रलयच!! हिमालयाच्या भूकंप किंवा पूराच्या बातम्या वाचल्या की महादेवाचे तांडवच चालले आहे असे वाटते! हरी ॐ!! - विशाल प्रफुल्ल...

विचार

Image
अलक (अति लघु कथा) मित्राच्या नॅनो मधून चाललो होतो. तो खूप सांभाळून गाडी चालवत होता. सगळे नियम पाळत होता. सिग्नल न तोडता, कुठेही हॉर्न नाही की लेन कटिंग नाही!!  त्याला थट्टे ने म्हणालो - "नॅनो चालवतोयस, घुसव बिनधास्त, एखाद दोनदा घासली तरी काही फरक पडणार नाही !!" मित्र म्हणाला - "तू मला नॅनो चालवताना बघतोयस, पण मी स्वतःला Mercedes चालवताना बघतोय. चुकीच्या सवयी नंतर सुधारण्या  पेक्षा त्या लावूनच घ्यायच्या नाहीत! काय?" इतर लोकं आपल्याला कसं बघतात या पेक्षा आपण स्वतःला कसे बघतो हे महत्वाचे !! आपल्या नकळत आपले विचारच आपल्याला घडवत असतात ... - विशाल प्रफुल्ल कर्णिक

Long drive

Image
आज घरी वातावरण तंगच होतं. विराज चा नववी चा निकाल लागला होता. म्हटलं तर "निकालच" लागला होता.  म्हणजे, नाडकर्ण्यांच्या घराण्यात एवढे कमी टक्के कधी कुणाला पडले नव्हते  "काय-काय म्हणून करत नाही या मुला साठी? याचं महत्वाचं वर्ष म्हणून चांगल्या पगाराची नोकरी सोडली मी. शाळा इतकी चांगली आहे. शिकवणी ला भरमसाठ पैसा ओतलाय. पण हा मुलगा अजिबात लक्ष देऊन अभ्यास करत नाही." आई चा त्रागा सुरु होता.  "बाबा, सांग ना रे आईला. दहावी म्हणजे काय सगळं आहे का? दहावी ला जर चांगले गुण नाही पडले तर काय जग संपणार आहे का?" विराज ने आपली बाजू मांडली. बाबा मात्र या सगळ्या प्रकारात शांत होता. आई आणि मुलगा दोघेही आपल्या-आपल्या ठिकाणी बरोबर होते. पण, बाबा काही बोलला नाही.  उरलेला दिवस तणावतच गेला.आदळ-आपट करत का होईना आई ने आपली कर्तव्ये पार पाडली. रात्री चे जेवण झाले आणि बाबा विराज ला म्हणाला - "चल, मस्त long drive ला जाऊन येऊ."  रात्री जेवणा नंतर बरेचदा दोघे बाप लेक आपल्या SUV मधून long drive ला जायचे. हा एक प्रकारे दोघांचा  छंदच होता. रात्री च्या रिकाम्या रस्त्या वर सुसाट गाडी प...

इच्छापत्र

Image
वृद्धाश्रमात येऊन शकुंतला बाईंना साधारण चार वर्षे झाली असतील. सत्तर च्या आस-पास वय. पण सुखवस्तू घरातून आल्यामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. राहणीमान सुद्धा एकदम व्यवस्थित. पाच वर्षांपूर्वी दत्तोपंत - म्हणजे शकुंतला बाईंचे मालक - गेले आणि सहा महिन्याच्या आत बाईंची रवानगी वृद्धाश्रमात झाली. मोठ्या मुलाने तळ मजला आणि छोट्या ने पहिला मजला असं वाटून घेतलं. बाईंनी आणि पंतांनी पै-पै जोडून बांधलेल्या त्या दोन मजली "पंढरी" मध्ये आता बाईंच्या नावाची एक "वीट" सुद्धा उरली नव्हती. पंतांचा धाक गेला आणि मुला-सुनांनी रंग बदलला. बाईंनी कित्येकदा मुलांकडे विनवणी केली होती. "बाबांनो, एका कोपऱ्यात पडून राहीन. पण,उरले-सुरले दिवस 'पंढरीत' घालवू दे. मालकांची आठवण आहे त्यात" आणि दर वेळी मुलांनी खोटी आश्वासनं देऊन त्यांची बोळवण केली. अगदी बाईंना कॅन्सर झालाय हे कळल्यावर सुद्धा मुलांनी त्यांच्या कडे लक्ष दिले नव्हते. पण, आज बाईंनी अचानक आपल्या मुलांना सहकुटुंब बोलावून घेतले होते. आजच्या भेटीला वकील काकांना सुद्धा बोलावले होते. श्री. मोकाशी हे पंतांचे वकील मित्र, त्यां...

बहीण-भाऊ

अलक (अति लघु कथा) "दादा.. दे ना", "दे रे" असं ती सारखी त्याच्या मागे लागली होती. तिची कसली तरी महत्वाची वस्तू त्याच्या हाती लागली होती.. बहिणीची मागणी पूर्ण करणार नाही तो भाऊ कसला ? तिने मागण्या अगोदरच तो तिला भरपूर देत होता...... त्रास !! - विशाल प्रफुल्ल कर्णिक (17/Jun/2020)

Speaker Phone

Image
कॉलेज च्या शेवटच्या वर्षात विनायकला एका चांगल्या IT कंपनी मध्ये नोकरी लागली. विनायक आपल्या आई-बाबा आणि आजी सोबत गणेश चाळीत राहत होता.  नवीन नोकरी सुरु होऊन जेम-तेम आठवडा झाला असेल तोच आजी आजारी पडली. सुसाट धावू पाहणाऱ्या आयुष्याच्या गाडीला जणू  स्पीड-ब्रेकर आडवा आला.  इकडे ऑफिस मध्ये विनायक आता चांगला स्थिराऊ लागला. त्याच्या बरोबर आणखीन ९ जणांचं कंपनी तर्फे ट्रेनिंग सुरु झालं. आज त्यांना Conference call संदर्भात ट्रैनिंग देणार होते. या सगळ्या नवीन पोरांना मोठ्या मीटिंग रूम मध्ये बसवण्यात आले. टेबलावरती मधो -मध एक स्पीकर फोन ठेवला होता.  "आता, या स्पीकर फोन वर आपले एक सिनियर मॅनेजर फोन करतील. त्यांच्याशी आपण सगळे ‘ते आपले कस्टमर आहेत’ असं समजून बोलायचं. प्रत्येकाने मोठयाने बोलायचं. आधी wish करायचं, स्वतःचं नाव सांगायचं ...." असे बरेच नियम सांगण्यात आले.  ठरल्या प्रमाणे फोनची घंटी वाजली. ट्रेनर ने फोन उचलला - "Hello! good evening, Suresh here." - असं अदबीने wish  केलं.  पण, पलीकडून सिनिअर मॅनेजर ऐवजी रिसेपशनिस्ट चा आवाज आला - "सुरेश सर, त्या नवीन मुलांमध...

पुरचुंडी

Image
पुरचुंडी हळू-हळू काठी टेकत-टेकत माई येत होत्या, त्यांचा लाडका श्री पहिल्यांदाच परदेशी चालला होता. म्हटलं, तर त्यांच काही नातं नव्हतं. पण गेली वीस वर्षं ते एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. श्री जेव्हा पाच-एक वर्षाचा होता, तेव्हा जोश्यांची पुण्यात बदली झाली. माई त्याच बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर राहत होत्या.   माईंचं सख्ख असं कुणीच नव्हतं. पण, श्री वर त्यांचा विशेष जीव होता. येता-जाता त्याला हाक मारून कधी शेंगा तर कधी लाडू असे 'खाऊ' त्या देत असत. बरेचदा श्री चा अभ्यास सुद्धा माईच घ्यायच्या. अजूनही श्री घरी येताना "माई आलोय गं " अशी हाक देऊनच पायरी चढायचा.  ऑफिस च्या कामा निमित्त श्री २-३ महिने विदेश वारीला जाणार म्हटल्यावर माईंचीच जास्त लगबग झाली. जमतील तसे त्यांनी त्याच्या आवडीचे लाडू बनवले आणि पुरचुंडी बांधून श्री ला द्यायला त्या आल्या.   इकडे श्री ची मात्र चांगलीच गडबड सुरु होती. परदेशी तर सोडाच, पण हा पुण्या बाहेरही कधी गेला नव्हता. पुन्हा-पुन्हा याद्या तपासून घेत होता. काही राहिलं तर नाही? चेक इन बॅग, हॅन्ड बॅग सगळं तपासून घेत होता. त्यातच त्याच्या उत्साही मित्र...

Nostalgia

Image
एक दिवस अचानक whatsapp वर बातमी आली - दूरदर्शन वर रामानंद सागर यांचं रामायण सुरू होणार !! ( पाठोपाठ सतर्क netizens चे "आता सरकार ने आपल्याला राम भरोसे सोडलंय" वगैरे जोक्स पण आले.)  खरं सांगायचं तर सुरुवातीला त्या बातमीचे मला काहीच वाटले नाही!!  "हा.. ठीक आहे ना! दूरदर्शनच शेवटी ते.. तसही कोण बघतो त्याला... आणि रामायण तर किती जुनी मालिका? जाऊदे, आपण भले आणि आपले काम भले" असा विचार करून रामायणाचा विचार मी सोडून दिला. पण, मग दोन दिवसानी पुन्हा एकदा रामायण मालिकेचे वेळापत्रक आले. बायको ने तर वट हुकूमच सोडला -  "आजपासून आपण सुद्धा रामायण बघू". मग काय? बायकोचा एवढा "वट" असताना "आराम" थोडेच करून चालणार? दूरदर्शनचं दर्शन घेऊन कित्येक वर्षे लोटली होती. ढीगभर चॅनेल्सच्या पसाऱ्यातून सगळ्यात आधी दूरदर्शन चा नॅशनल चॅनेल शोधून काढला.  मग रामायणाच्या वेळा पाहून reminders लावून ठेवले आणि संधकाळच्या "राम भेटीची" वाट पाहू लागलो. रात्री ९ च्या ठोक्याला "टिंग टिंग ट्रिंग ... ...

कान्हा ...

Image

कहानी घर घर की!

  Lockdown day 01 :  तो: अगं दे मी जरा तुला मदत करतो. आज जमतील तसं भांडी घासून देतो. दोघे Load वाटून घेऊ. ती : नको रे. तुला सवय नाही. बघते मी कसं करायचं ते. Lockdown day 21: ती (TV बघता बघता) : जरा फ्रिज मधले पण डब्बे घेऊन टाक, खूप दिवस झालेत धुवायचे राहिलेत ते!!  TV वर रामायण चालू असत आणि सीता रामाचे चरणस्पर्श करत असते 😄😄😄😄 #काहीही

माणुसकीच्या शत्रूसंगे ...

Image

विसरलीस तू ...

Image

जय शिवराय

Image

पुणेरी पुणेकर

Image

खरा कोच ..

Image
MacD मध्ये पाऊल ठेवलं आणि नेहमी पेक्षा आज इथे जास्त गर्दी आहे हे लक्षात आलं. कुठल्या तरी क्लब ची 10-12 मुलं तिथे होती. साधारण पाचवी-सातवीतली ती मुलं असावीत आणि नुकतंच कुठलं तरी मैदान मारून आलेत असं त्यांचं सेलिब्रेशन सुरु होतं. त्यांचा तो ओसंडून वाहणारा उत्साह खरंच खूप भारी वाटत होता.  त्यांच्यातल्या काही मुलांचे ऑर्डर देणे सुरु होते. त्यामुळे काउंटर ला गर्दी होती. माझ्या समोर त्यांच्यातलाच एक मुलगा आणि त्याच्या बरोबर बोलत उभा असलेला तरुण दिसला. तो तरुण त्यांचा कोच असावा. त्या दोघांमधलं संभाषण हे खूप हात वारे करत सुरु होत. थोडा वेळ नीट लक्ष दिल्यावर कळलं कि "तो" मुलगा मूक-बधिर आहे. पण बाकीची मुलं तर तशी नव्हती!! मला त्या तरुणाचं कौतुक वाटलं. त्याने खूप सफाईदार पणे "त्या" मुलाशी संभाषण सुरु ठेवलें होते.  एक-एक करत मुलं ऑर्डर देऊन बाजूला सरकत होती आणि त्या दोघांचा नंबर आला. मला वाटलं कि दोघेही एकत्र पुढे जातील. पण तसं काही झालं नाही. दोघांचे बोलणे आणि हातवारे सुरूच होते.  शेवटी तो तरुण किंचाळलाच "You have to go !" आणि त्या मुलाला पुढे ढकलून स्वतः दोन पावले म...