विचार




अलक (अति लघु कथा)

मित्राच्या नॅनो मधून चाललो होतो. तो खूप सांभाळून गाडी चालवत होता. सगळे नियम पाळत होता. सिग्नल न तोडता, कुठेही हॉर्न नाही की लेन कटिंग नाही!! 

त्याला थट्टे ने म्हणालो - "नॅनो चालवतोयस, घुसव बिनधास्त, एखाद दोनदा घासली तरी काही फरक पडणार नाही !!"

मित्र म्हणाला - "तू मला नॅनो चालवताना बघतोयस, पण मी स्वतःला Mercedes चालवताना बघतोय. चुकीच्या सवयी नंतर सुधारण्या 
पेक्षा त्या लावूनच घ्यायच्या नाहीत! काय?"

इतर लोकं आपल्याला कसं बघतात या पेक्षा आपण स्वतःला कसे बघतो हे महत्वाचे !! आपल्या नकळत आपले विचारच आपल्याला घडवत असतात ...


- विशाल प्रफुल्ल कर्णिक


Comments

  1. आपण जसे आपल्याला बघतो, तसे लोकं आपल्याला बघतात...👌👌

    ReplyDelete
  2. आपल्या नजरेतून दिसणारं इतरांचं जग नेहमीच खरं असतं असं नाही, कुठल्याही गोष्टीतला आनंद हा सापेक्ष असतो हेच खरे...

    ReplyDelete
  3. हे अगदी खर म्हणाला सर तुम्ही,
    इतर लोकं आपल्याला कसं बघतात या पेक्षा आपण स्वतःला कसे बघतो हे महत्वाचे !!
    खुपच छान.

    ReplyDelete
  4. छान संकल्पना आहे

    ReplyDelete
  5. आत्मपरीक्षण मनुष्यास घडवत असते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह