Posts

Speaker Phone

Image
कॉलेज च्या शेवटच्या वर्षात विनायकला एका चांगल्या IT कंपनी मध्ये नोकरी लागली. विनायक आपल्या आई-बाबा आणि आजी सोबत गणेश चाळीत राहत होता.  नवीन नोकरी सुरु होऊन जेम-तेम आठवडा झाला असेल तोच आजी आजारी पडली. सुसाट धावू पाहणाऱ्या आयुष्याच्या गाडीला जणू  स्पीड-ब्रेकर आडवा आला.  इकडे ऑफिस मध्ये विनायक आता चांगला स्थिराऊ लागला. त्याच्या बरोबर आणखीन ९ जणांचं कंपनी तर्फे ट्रेनिंग सुरु झालं. आज त्यांना Conference call संदर्भात ट्रैनिंग देणार होते. या सगळ्या नवीन पोरांना मोठ्या मीटिंग रूम मध्ये बसवण्यात आले. टेबलावरती मधो -मध एक स्पीकर फोन ठेवला होता.  "आता, या स्पीकर फोन वर आपले एक सिनियर मॅनेजर फोन करतील. त्यांच्याशी आपण सगळे ‘ते आपले कस्टमर आहेत’ असं समजून बोलायचं. प्रत्येकाने मोठयाने बोलायचं. आधी wish करायचं, स्वतःचं नाव सांगायचं ...." असे बरेच नियम सांगण्यात आले.  ठरल्या प्रमाणे फोनची घंटी वाजली. ट्रेनर ने फोन उचलला - "Hello! good evening, Suresh here." - असं अदबीने wish  केलं.  पण, पलीकडून सिनिअर मॅनेजर ऐवजी रिसेपशनिस्ट चा आवाज आला - "सुरेश सर, त्या नवीन मुलांमध...

पुरचुंडी

Image
पुरचुंडी हळू-हळू काठी टेकत-टेकत माई येत होत्या, त्यांचा लाडका श्री पहिल्यांदाच परदेशी चालला होता. म्हटलं, तर त्यांच काही नातं नव्हतं. पण गेली वीस वर्षं ते एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. श्री जेव्हा पाच-एक वर्षाचा होता, तेव्हा जोश्यांची पुण्यात बदली झाली. माई त्याच बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर राहत होत्या.   माईंचं सख्ख असं कुणीच नव्हतं. पण, श्री वर त्यांचा विशेष जीव होता. येता-जाता त्याला हाक मारून कधी शेंगा तर कधी लाडू असे 'खाऊ' त्या देत असत. बरेचदा श्री चा अभ्यास सुद्धा माईच घ्यायच्या. अजूनही श्री घरी येताना "माई आलोय गं " अशी हाक देऊनच पायरी चढायचा.  ऑफिस च्या कामा निमित्त श्री २-३ महिने विदेश वारीला जाणार म्हटल्यावर माईंचीच जास्त लगबग झाली. जमतील तसे त्यांनी त्याच्या आवडीचे लाडू बनवले आणि पुरचुंडी बांधून श्री ला द्यायला त्या आल्या.   इकडे श्री ची मात्र चांगलीच गडबड सुरु होती. परदेशी तर सोडाच, पण हा पुण्या बाहेरही कधी गेला नव्हता. पुन्हा-पुन्हा याद्या तपासून घेत होता. काही राहिलं तर नाही? चेक इन बॅग, हॅन्ड बॅग सगळं तपासून घेत होता. त्यातच त्याच्या उत्साही मित्र...

Nostalgia

Image
एक दिवस अचानक whatsapp वर बातमी आली - दूरदर्शन वर रामानंद सागर यांचं रामायण सुरू होणार !! ( पाठोपाठ सतर्क netizens चे "आता सरकार ने आपल्याला राम भरोसे सोडलंय" वगैरे जोक्स पण आले.)  खरं सांगायचं तर सुरुवातीला त्या बातमीचे मला काहीच वाटले नाही!!  "हा.. ठीक आहे ना! दूरदर्शनच शेवटी ते.. तसही कोण बघतो त्याला... आणि रामायण तर किती जुनी मालिका? जाऊदे, आपण भले आणि आपले काम भले" असा विचार करून रामायणाचा विचार मी सोडून दिला. पण, मग दोन दिवसानी पुन्हा एकदा रामायण मालिकेचे वेळापत्रक आले. बायको ने तर वट हुकूमच सोडला -  "आजपासून आपण सुद्धा रामायण बघू". मग काय? बायकोचा एवढा "वट" असताना "आराम" थोडेच करून चालणार? दूरदर्शनचं दर्शन घेऊन कित्येक वर्षे लोटली होती. ढीगभर चॅनेल्सच्या पसाऱ्यातून सगळ्यात आधी दूरदर्शन चा नॅशनल चॅनेल शोधून काढला.  मग रामायणाच्या वेळा पाहून reminders लावून ठेवले आणि संधकाळच्या "राम भेटीची" वाट पाहू लागलो. रात्री ९ च्या ठोक्याला "टिंग टिंग ट्रिंग ... ...

कान्हा ...

Image

कहानी घर घर की!

  Lockdown day 01 :  तो: अगं दे मी जरा तुला मदत करतो. आज जमतील तसं भांडी घासून देतो. दोघे Load वाटून घेऊ. ती : नको रे. तुला सवय नाही. बघते मी कसं करायचं ते. Lockdown day 21: ती (TV बघता बघता) : जरा फ्रिज मधले पण डब्बे घेऊन टाक, खूप दिवस झालेत धुवायचे राहिलेत ते!!  TV वर रामायण चालू असत आणि सीता रामाचे चरणस्पर्श करत असते 😄😄😄😄 #काहीही

माणुसकीच्या शत्रूसंगे ...

Image

विसरलीस तू ...

Image

जय शिवराय

Image

पुणेरी पुणेकर

Image

खरा कोच ..

Image
MacD मध्ये पाऊल ठेवलं आणि नेहमी पेक्षा आज इथे जास्त गर्दी आहे हे लक्षात आलं. कुठल्या तरी क्लब ची 10-12 मुलं तिथे होती. साधारण पाचवी-सातवीतली ती मुलं असावीत आणि नुकतंच कुठलं तरी मैदान मारून आलेत असं त्यांचं सेलिब्रेशन सुरु होतं. त्यांचा तो ओसंडून वाहणारा उत्साह खरंच खूप भारी वाटत होता.  त्यांच्यातल्या काही मुलांचे ऑर्डर देणे सुरु होते. त्यामुळे काउंटर ला गर्दी होती. माझ्या समोर त्यांच्यातलाच एक मुलगा आणि त्याच्या बरोबर बोलत उभा असलेला तरुण दिसला. तो तरुण त्यांचा कोच असावा. त्या दोघांमधलं संभाषण हे खूप हात वारे करत सुरु होत. थोडा वेळ नीट लक्ष दिल्यावर कळलं कि "तो" मुलगा मूक-बधिर आहे. पण बाकीची मुलं तर तशी नव्हती!! मला त्या तरुणाचं कौतुक वाटलं. त्याने खूप सफाईदार पणे "त्या" मुलाशी संभाषण सुरु ठेवलें होते.  एक-एक करत मुलं ऑर्डर देऊन बाजूला सरकत होती आणि त्या दोघांचा नंबर आला. मला वाटलं कि दोघेही एकत्र पुढे जातील. पण तसं काही झालं नाही. दोघांचे बोलणे आणि हातवारे सुरूच होते.  शेवटी तो तरुण किंचाळलाच "You have to go !" आणि त्या मुलाला पुढे ढकलून स्वतः दोन पावले म...

Promise !

Image
"हॅलो! हा नंबर कुणाचा आहे ?" पलीकडून आलेल्या या प्रश्नाने मी थोडा गोंधळलोच. मला फोन करून असं विचारणारी व्यक्ति म्हणजे विश्वास चे बाबा होते. मी (पटकन स्वतःला सावरत उत्तर दिलं) - "काका मी विशाल बोलतोय. विश्वास चा मित्र" काका - "विशाल? कोण विशाल?" मी - "काका तुम्ही मला ओळखले नाहीत? मी विश्वास चा वर्गमित्र. लहान असताना बरेचदा आलोय तुमच्या कडे" आम्ही शाळेत असताना बरेचदा विश्वासच्या घरी जात असू. विश्वास चे मित्र आलेत म्हटल्यावर काका एकदम खुश !! कधी भेळ आणून दे तर कधी चॉकलेट. काकांचा स्वभाव एकदम खेळकर. आम्हा मुलांना बघून ते "हाफ चड्डी गॅंग" म्हणून चिडवायचे !!! काका - "अच्छा .. विशाल तू होय? कसा आहेस? अरे तुझ्या मोबाईल वरून इतक्यात ४-५ वेळा कॉल आलेत" विश्वास भारतात असताना कधीतरी मी त्याचा हा नंबर माझ्या कडे सेव्ह केला होता. आता त्याला सिंगापोर ला जाऊन सुद्धा ५-६ वर्ष झाली होती. त्याचा हा नंबर तसाच माझ्या कडे राहिला होता. पण मी त्यावर कधी कॉल केले? काका - "अरे बहुदा चुकून लागले असावेत. मी इथून बरेचदा हॅलो हॅलो म्हणालो पण तुझ्याकडू...

Dinner

Image
एका मीटिंग मधून दुसऱ्या मीटिंग मध्ये जाता-जाता त्याने सहजच मोबाईल चेक केला. बायको चा मिस्ड कॉल दिसला. "काय काम असेल?" असा विचार करतच त्याने कॉल-बॅक केला. तो - " हं ! तू फोन केला होतास?" ती - "हो. अरे, मी निघाले होते तर निघता-निघता बोलावं म्हटलं ..." तो - "तू ? कुठे ?" ती - " बघ, विसरलास ना? अरे सकाळीच आपला विषय झाला. मी आज आई कडे जाणार आहे. आठवडा भर मी नाहीये. .." तिचं बोलणं मध्येच तोडत तो म्हणाला - "ओह येस! आपला विषय झाला होता. चल हैप्पी जर्नी. पोचलीस कि फोन कर." ती - "अरे, पण तू रात्री बाहेरच डिनर करायचा आहेस. लक्षात आहे ना? मी काही बनवलं नाहीये. एक तर माझं मलाच आवरता आवरता उशीर झालाय आणि.. " तो - " अगं हो.. कळलं. आता निघतो. मीटिंग ला उशीर होतोय. रात्री फ्री झालो कि करतो तुला कॉल." एवढं बोलून त्याने फोन ठेवला. तिने बोललेलं "OK .. ठीक" सुद्धा त्याने ऐकलं नाही ! त्याचा पुढचा अक्खा दिवस खूप बिझी गेला. सलग मीटिंग, नवीन प्रोजेक्टचं काम. रात्री ऑफिस मधून निघायला साडे बारा वाजले. पण दिवस मना सारखा गेला...

मधुबन खुशबू देता है !!

Image
मी सहसा रात्री ९:०० नंतरच ऑफिस मधून निघतो. त्या सुमारास काही रेडिओ स्टेशन्स वर मस्त रेट्रो गाणी चालू असतात. दिवस भराचा क्षीण घालवायला अजून काय हव ? तर, त्या दिवशी (खरं तर रात्री), दिवस भराची ऑफिस-गिरी संपवून घरी निघालो. "आज कुणाच्या शिव्या पडल्या नाहीत, म्हणजे दिवस चांगला गेला” असं स्वतःचं कौतुक करून दिवसाची सांगता केली. कार मध्ये गाणी ऐकत-गुणगुणत निघालो. येसूदास च्या मधाळ आवाजात "मधुबन खुशबू देता है...." चालू होतं. वाटेत एका सिग्नलला गाडी कधी थांबवली माझं मलाच कळलं नाही. मी एक प्रकारच्या तंद्रीत होतो. अचानक काहीतरी चमकल्या मुळे माझी तंद्री तुटली. समोरून एक साधारण १०-१२ वर्षाचा मुलगा कसला तरी चेंडू हवेत उडवत येत होता. तो चेंडू हवेत उडाला कि त्या मधून निळा-लाल लखलखाट व्हायचा. त्या "bright light" ने मला "disturb" केलं होतं. चीड-चीड झाली यार! बर, आता हा पोरगा आपल्या जवळ येऊन "सर, २० रुपीस" वगैरे बोलून सतावणार. या विचाराने अजूनच वैताग वाढला. जमेल तितक्या चपळाईने मी कार च्या काचा वर उचलल्या आणि "हुश्श्श, सुटलो एकदाचा!" असा सुस्कारा ...

शिव स्फुर्ती

Image
कोणतेही संकट आले कि डोळे बंद करायचे आणि स्वतःला एकच प्रश्न विचारायचा - हे संकट काय महाराजांवर चाल करून आलेल्या अफझल खाना पेक्षा मोठं आहे? उत्तर नक्कीच "नाही" असे मिळेल. त्यातूनही यदा कदाचित स्फुरण चढले नाही तर आग्र्या हुन सुटका आठवायची - महाराजांना कपटाने आग्र्याला कैद केले. चारहि बाजूला दुश्मन, परका मुलुख आणि सख्त पहारा. कुठल्याही क्षणी पुढच्या क्षणाचा भरवसा नाही. त्याही परिस्थितीत महाराज सुखरूप वाचलेच ना. नुसते वाचले नाही तर आपल्या सहकाऱ्यांना आणि शंभू राजांना सुद्धा सुखरूप सोडवून आणले. क्षणार्धात समोरचं संकट खुजं झालेच म्हणून समजा !! समर्थ सांगूनच गेलेत - शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी !! छत्रपती श्री शिवाजी महाराज की ... जय !!! - विशाल प्रफुल्ल कर्णिक

Fair Chance !

Image
"विशाल... जरा दोन मिनिटे बोलू का?" कानावर हे शब्द पडले आणि मी दचकलोच! हे विचारणारा दुसरा-तिसरा कोणी नसून आमच्या ऑफिस मधला सगळ्यात Brilliant समजला जाणारा शिशिर होता. मी नोकरीला लागून २-३ महिने झाले असतील, पण तेवढ्या काळात शिशिर बद्दल खूप ऐकले होते. कंपनीत त्याचा एक वेगळाच रुबाब होता आणि आदर ही! तर, अशा या वलयांकित माणसाने मला विचारलेल्या प्रश्नाने मी पुरता गोंधळून गेलो अन ताडकन उभा राहिलो. "शिशिर, मला बोलवायचे, मीच आलो असतो. काही काम आहे का? , मी तयार आहे!" नुकताच कॉलेज पास करून पहिल्या नोकरीत असणारा उत्साह माझ्या चेहऱ्यावर होता. "कामाचं असं काही नाही, पण मघाशी तुम्ही मुलं जिथं कॉफी प्यायला उभे होतात ना, त्याला लागूनच माझं केबिन आहे." - शिशिर सांगत होता. “Ohh… I am so sorry, आम्ही जरा जास्तच मोठ्याने बोलत होतो" आपल्या मुळे आजू बाजू च्या लोकांना त्रास होत असेल हे कॉफी पिताना आमच्या लक्षात आलं नव्हतं. शिशिर ने मला थांबवलं. "मला त्याचा काहीही त्रास झाला नाही. सवय झालीये आता! पण त्या बोलण्याच्या ओघात तू ऑफिस बद्दल बऱ्याच तक्रारी करत होता" माझ्या ...

Ambulance

Image
काल एक घटना घडली. म्हटलं तर अगदीच क्षुल्लक पण का कोण जाणे मला खूप छान वाटले!  स्थळ: गोळीबार मैदान चौक सिग्नल. वेळ: सकाळी १०:३०. मी रोज कोंढवा ते औंध वाया कॅम्प अशी तपश्चर्या करून ऑफिस गाठतो.   कालसुद्धा मी तेच करीत होतो.  तर झाला असं, कि मी नेहमी प्रमाणे कॅम्प च्या दिशेने प्रस्थान केले. सकाळी घाई ची वेळ. खोड काढल्या प्रमाणे नेमका गोळीबार मैदान चा सिग्नल लाल झाला. "ह्याला पण आत्ताच लाल करायची होती का?"  असा विचार (नेहमी प्रमाणे) त्या सिग्नलला थोडक्यात अडकलेल्या प्रत्येकाच्या मनात नक्की आला असणार !  असो, सिग्नल कधी एकदा हिरवा होतो याची वाट पाहत निमूट पणे उभा राहिलो (संस्कार दुसरा काय ;))  साधारण एका मिनिटात इथला सिग्नल हिरवा होतो असा अनुभव. त्या सुमारास असंख्य गाड्यांचे हॉर्न्स आणि गाडी चालू झाल्याचे आवाज येऊ लागले. हा अनुभव सुद्धा  नेहमीचाच असल्या मुळे मी माझ्या गाडी चा आवाज त्यात मिसळला (मिले सूर मेरा तुम्हारा) इथपर्यंत सर्व नेहमीचेच ! आता खरी गम्मत ... अवघे ७-८ सेकंद  बाकी असताना, लांबून एक ambulance चा आवाज आला. तो आवाज हळू हळू मोठा होतोय अ...